शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

भाजपाच्या राजकारणाने देश कमकुवत; ‘काटेंगे तो बटेंगे’वरुन अकबरोद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 2:02 PM

मराठा, मुस्लीम, दलितांनी एकत्र यावे; एमआयएम नेते अकबरोद्दीन ओवेसी यांची हाक

छत्रपती संभाजीनगर : भाजपा मागील दहा वर्षांपासून हिंदू, मुस्लीम राजकारण करीत आहे. ‘काटेंगे तो बटेंगे’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. हा देश योगी यांचा नसून सर्वांचा आहे. टिळा लावणारे, पगडी बांधणारे आणि दाढी ठेवणारे सर्वांचा हा देश आहे. जातीय राजकारण नको, असे कधीही भाजपने म्हटलेले नाही, असा टोलाही एमआयएम नेते अकबरोद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (दि.५ नोव्हें.) लगावला. भाजपामुळे देश कमकुवत होत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. 

शहरातील आमखास मैदानावर नासेर सिद्दिकी आणि इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ रात्री जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ओवेसी म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेनेचे दोन तुकडे झाले. सत्तेसाठी राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. यांना फक्त सत्ता हवी आहे ती कोणत्याही मार्गाने आली तरी चालेल. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची यांना काहीच देणे घेणे नाही. बेरोजगारी वाढली, महिलांवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली. पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, गॅस सिलिंडर महागला तरीही सरकारला काही देणे घेणे नाही. मागील तीस वर्षात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला एक रुपयाही देण्यात आला नाही. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने किमान ५० हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तत्पूर्वी पक्षाचा जाहीरनामा ओवेसी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

मराठा, मुस्लीम, दलितांनी एकत्र यावेभाजपा बेरोजगारी, महागाई आदी विषयांवर बोलत नाही, हिंदू, मुस्लीम करत राज्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत मराठवाड्याच्या तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा, मुस्लीम, दलितांनी एकत्र यावे, असे आवाहन अकबरोद्दीन ओवेसी यांनी केले. तसेच मराठा आरक्षणाची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी पाठिंबा दर्शविला.

जलील यांचा विरोधकांना टोलाइम्तियाज जलील यांनी मार्गदर्शन करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तिकीट न दिल्याने पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला डिपॉझिट जप्त करण्याचा इशारा दिला. आपल्या विरोधात उभे असलेले मुस्लीम उमेदवार पैसे घेऊन थांबल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्व