ग्रा.पं. निकाल :शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचेही दावे प्रतिदावेबदनापूर : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे सोमवारी दुपारी सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा करीत असून त्याखालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्षही आपापल्यापरीने दावे करीत आहेत.सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. निरीक्षक निखील ओसवाल, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार व्ही. एस. पप्पुलवाड यांच्या उपस्थितीत चार टेबलांवर चार फेºयांमध्ये मतमोजणी करण्यात आली.दुपारी १ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. डोंगरगाव येथील सरपंचपदाची निवडणूक अटीतटीची झाली. येथे केवळ सात मतांनी विजय संपादन केला. यावेळी विजयी उमेदवार व त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी गुलालाची उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायत निकालांमुळे अनेक मातब्बरांना मतदारांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून हद्दपार केले असून नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे.भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव भुजंग यांनी किन्होळा ग्रामपंचायतमध्ये उतरून सरपंच म्हणुन निवडून आले आहेत. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य बाळू कांबळे यांची पत्नी सविता कांबळे यादेखील राजेवाडीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र, माजी पंचायत समिती सदस्यामुक्ता बरांडे यांना सायगाव सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.निवडून आलेले सरपंचबुटेगाव-महानंदा भास्कर गवारे,डोंगरगावा- विष्णू रावसाहेब घनघाव,चिखली- मेनका प्रकाश सोनवणे,घोटन - रूखमन बडू जगताप,धामणगाव-मोनिका अनिल साळवे,रांजणगाव- शेख नूर शेख गफ ार,किन्होळा- भीमराव कडुबा भुजंग,सायगाव- शुभांगी प्रमोद शिंदे,वरूडी संध्याबाई डिगांबर भिसे,राजेवाडी- सविता बाळु कांबळे,मांडवा- अॅड. झिगराजी बजाबा मिसाळ,कडेगाव- भिमराव गंगाराम जाधव,ढोकसाळ आशाबाई शिवाजी वाघसिंधीपिंपळगाव - वैजिनाथ सिरसाठ (बिनविरोध)
बदनापूरमध्ये भाजपचा क्रमांक एकचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:32 AM