शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

होर्डिंग धोरणात महापुरुषांच्या आडून सेना नेत्यांचे वाढदिवस; औरंगाबाद मनपाच्या यादीवर भाजपचा आक्षेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 7:28 PM

शहरात अनधिकृत होर्डिंग लागू नयेत म्हणून महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच होर्डिंगचे धोरण निश्चित केले.

औरंगाबाद : शहरात अनधिकृत होर्डिंग लागू नयेत म्हणून महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच होर्डिंगचे धोरण निश्चित केले. यामध्ये विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त होर्डिंग लावण्याची मुभा दिली आहे. त्यात ३ सेना नेत्यांची नावे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपने या यादीवर तीव्र आक्षेप नोंदविला असून, महापुरुषांच्या आड सेना नेत्यांची नावे कशासाठी टाकण्यात आली, ही नावे त्वरित काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरात पूर्वी भाऊ, दादांच्या बेकायदा होर्डिंग्जचे अक्षरश: पेव फुटले होते. प्रत्येक चौक, प्रमुख रस्त्यांवर बेकायदा होर्डिंग्जचा विळखा पडल्यामुळे न्यायालयाने बेकायदा होर्डिंग्ज हटविण्याचे महापालिकेला वारंवार आदेश दिले; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. अखेर न्यायालयाने अवमान कारवाईचा इशारा दिल्यानंतर गेल्या महिन्यात सुमारे आठ हजार होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक काढण्यात आले. 

होर्डिंग्जचे धोरण ठरविण्यासाठी प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव सादर केला होता. त्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त होर्डिंग्ज लावण्याची परवानगी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, अशा ठिकाणी दिली जाईल, असे नमूद केले होते; मात्र प्रस्ताव मंजूर करताना महापौरांनी गटनेत्यांकडून कोणकोणत्या दिवशी होर्डिंग लावण्याची मुभा द्यावी म्हणून यादी घेतली. या यादीनुसार ७८ दिवस होर्डिंग्ज, बॅनर्सला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महापुरुषांच्या नावासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खासदार चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, आ. संजय शिरसाट, शिवसेनेचा वर्धापन दिन अशा नावांचा प्रस्तावामध्ये समावेश करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपने या विरोधात भूमिका घेतली आहे. याबाबत उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला आहे. माजी स्थायी समिती सभापती राजू शिंदे यांनीही यादी बदलण्याची मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचाही आक्षेपमहापालिकेने होर्डिंग लावण्यासाठी जाहीर केलेल्या यादीमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, औरंगाबाद पश्चिमचे आमदार आ. संजय शिरसाट यांचा समावेश आहे. या यादीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख यांनीही आक्षेप घेतला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांना आपापल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करायचे असतात. केवळ एकाच पक्षाच्या नेत्यांची नावे यादीत असतील तर ती एकाधिकारशाही आहे. आमच्या पक्षाचे नेते खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रियाताई सुळे यांची नावे नसतील तर त्याला आमचा आक्षेप आहे. यासंदर्भात आम्ही आयुक्तांकडे दाद मागू.  महापुरुषांची यादी असेल तर त्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश नको आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांचा समावेश असेल तर ती यादी सर्वसमावेशक असावी. महापालिकेने याबाबत काही धोरण आखले आहे, असे दिसत नाही. शिवसेनेने मनमानी पद्धतीने यादी तयार केली आहे, असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस