जरंडी : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानसभेतील मताधिक्य फोडत जरंडी येथे भाजपाने एकहाती सत्ता ताब्यात घेतली. जरंडी ग्रामपंचायतीत भाजपा-शिवसेना अशी सरळ लढत झाली. भाजपला मतदारांनी कौल दिला असून अकराच्या अकरा जागांवर उमेदवार निवडून आले आहेत.
जरंडी ग्रामपंचायतीच्या या विजयाचा तालुक्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये जरंडी भाजपाचा हा फार्म्यला वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आमखेडा गटात व आमखेडा पंचायत गणात जरंडी ग्राम पंचायतीचा हा निकाल परिणामकारक ठरणारा आहे. शिवसेनेची वोट बँक ही जरंडी आहे, असा दावा करणारे राज्यमंत्री सत्तार यांना मतदारांनी सपशेल खोटे ठरविले. भाजपाच्या वतीने आठ महिलांना संधी देण्यात आली हो. आठही महिला उमेदवार विजयी झाल्या असून येथे महिलाराज आले आहे.
जरंडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार
सलमाबाई तडवी, नीलिमा पवार, कल्पनाबाई मुठ्ठे, वंदना राजेंद्र पाटील, संजय गिरधर पाटील, स्वाती दिलीप पाटील, लीलाबाई निकम, मधुकर लोटन पाटील, मधुकर सोनवणे, चंद्रकलाबाई चौधरी, द्वारकाबाई राठोड़ यांचा विजयात समावेश आहे. जरंडी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी एकनाथ चौधरी, दिलीप पाटील, संजीवन सोनवणे, संघपाल सोनवणे, रामदास क्षीरसागर यांनी परिश्रम घेतला.
------
छायाचित्रओळ-जरंडी ता.सोयगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार व दुसऱ्या छायाचित्रात जल्लोष साजरा करताना.