शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

मोठी राजकीय खेळी! राज्यात भाजपची खरी लढत काँग्रेसशी; तर उद्धवसेनेचा सामना शिंदेसेनेशी

By नजीर शेख | Published: May 03, 2024 4:54 PM

काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे राज्यातील एकूण ४८ मतदारसंघांतील लढतींचे चित्र मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतर स्पष्ट झाले आहे. राज्यात १५ लोकसभा मतदारसंघांत भाजपची लढत काँग्रेसशी होणार आहे, तर उद्धवसेना आणि शिंदेसेनेत १३ जागांवर जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिंदेसेनेचा एकाही मतदारसंघात मुकाबला नाही.

महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेना २१ जागा लढत आहे, तर महायुतीमध्ये शिंदेसेनेने १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे या पट्ट्यात चुरस दिसत आहे. भाजप काँग्रेसविरुद्ध लढत असलेल्या १५ जागांपैकी सहा जागा या विदर्भातील आहेत. विदर्भात एकूण १० जागा आहेत. त्याखालोखाल भाजप मराठवाड्यात तीन, तर पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत दोन ठिकाणी काँग्रेसशी झुंजणार आहे.

शिंदेसेनेची सर्व शक्ती ठाकरेंविरुद्धशिंदेसेनेचे सुमारे ८५ टक्के उमेदवार उद्धवसेनेशी लढत आहेत. शिंदेसेनेची शक्ती ठाकरेंविरुद्ध खर्ची पडत आहे. ज्या राष्ट्रवादीविरुद्ध शिंदेसेनेने फुटीआधी रान उठविले होते, त्याविरुद्ध एकही उमेदवार नाही.

शिवसेनेला यश मर्यादितच२०१९ च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे राज्यात १८ खासदार निवडून आले होते. यंदा दोन गट असले तरी शिवसेना म्हणून एकमेकांविरुद्ध लढणारे १३ खासदार निवडून येण्याची संधी आहे. याशिवाय उद्धवसेना भाजपशी पाच जागांवर आणि एका जागेवर रासपशी लढत आहे, तर शिंदेसेना काँग्रेसशी दोन ठिकाणी लढत आहे. या ठिकाणाचे दोन्ही शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आले तरी उद्धवसेना आणि शिंदेसेनेची मिळून खासदारांची संख्या २० च्या वर जाणार नाही, याची काळजी भाजपने घेतल्याचे दिसते.

राज्यातील लढतीचे चित्रउद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना- १३ मतदारसंघ- दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली.उद्धवसेना विरुद्ध भाजप - ५ मतदारसंघ - उत्तर पूर्व मुंबई, पालघर, सांगली, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, जळगाव.उद्धवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) - २ मतदारसंघ- उस्मानाबाद, रायगडउद्धवसेना विरुद्ध रासप - १ मतदारसंघ - परभणी.

काँग्रेस विरुद्ध भाजप - १५ मतदारसंघ - उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई, सोलापूर, पुणे, नंदूरबार, धुळे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, जालना.काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना - २ मतदारसंघ - कोल्हापूर, रामटेककाँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध भाजप- ८ मतदारसंघ - भिवंडी, सातारा, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, वर्धा, बीड.राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) - २ मतदारसंघ - बारामती, शिरुर.राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध शिंदेसेना- ००

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी