लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेच्या प्रत्येक टीकेला भाजपने आजवर उत्तर दिले आहे. आमच्यावर कितीही टीका केली तरी त्याचे ताबडतोब उत्तर दिले जाते. त्यामुळे कुणी हे समजू नये की, भाजप ऐकून घेत असेल. असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केला. शिवसेना सत्तेत्त सोबत असून, मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका करीत आहे. तरीही शिवसेना समविचारी पक्ष म्हणून भाजप सूर आळवीत आहे. नेमकी भाजपची भूमिका काय, यावर त्यांनी शिवसेनेच्या प्रत्येक आरोपाचे उत्तर दिले जात असल्याचे सांंगितले. तसेच समविचारी पक्षाला सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले; परंतु निवडणुकीच्या वेळी ठरवू कुणाला सोबत घ्यायचे आहे.केंद्र सरकारच्या चार वर्षपूर्तीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत खा. दानवे बोलत होते. खा. दानवे म्हणाले की, २०१४ नंतर राज्यात, देशात ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना त्यांच्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. परिणामी, त्यांनी भाजप विरोधात एकत्रित येऊन आघाड्या स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आपले अस्तित्व संपवून टाकेल, अशी भीती प्रादेशिक पक्षांना आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र शासनाने आजवर राबविलेल्या विविध योजनांची माहिती व त्यातून झालेल्या लाभाची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आदींची उपस्थिती होती.
शिवसेनेच्या टीकेला भाजपचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:26 AM