फुलंब्री (औरंगाबाद ) : नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ नगरसेवक व नगराध्यक्ष पद भाजपने काबीज केली. भाजपच्या सुहास सिरसाठ यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांचा १९० मतांनी पराभव केला. शहर विकास आघाडीचे केवळ पाच नगर सेवक निवडून आले तर एमआयएमचा १ नगरसेवक निवडून आला.
नगर पंचायतसाठी बुधवारी मतदान झाले होते. आज याची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात करण्यात आली. पहिल्या १५ मिनिटामध्येच नगरसेवक पदाचे निकाल हाती आली. तर नगराध्यक्ष पदाचा निकाल सर्वात शेवटी जाहीर करण्यात आला. १७ पैकी ११ जागा व नगराध्यक्ष पदी निर्विवाद वर्चस्व गाजवत भाजपने शहर विकास आगःडीला शह दिला. संपूर्ण निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरभर जोरदार जल्लौश केला.
शहर विकास आघाडीला धक्का भाजपच्या विरोधात तीन पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली होती. यामुळेच हा पराभव शहर विकास आघाडीचे प्रमुख माजी आमदार डॉ कल्याण काळे यांना मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघातील नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आल्याने याचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला नक्कीच होईल.
विजयी नगरसेवक व त्यांना मिळालेली मते
भाजपा -एकनाथ महादू ढोके [ ३४० ],द्वारका संतोष जाधव [ ३४८ ],शामबाई किसन गुंजाळ-[२५५ ],अश्विनी वाल्मिक जाधव -[ २१५ ],इंदुबाई मधुकर मिसाळ -[३८२ ],वैशाली बाबासाहेब सिनगारे -[ ३६९ ],गणेश कृष्णा राउत -[३८२ ],रत्ना वालुबा सोनवणे -[ ४०५ ],अजय वामनराव शेरकर -[ ४७० ],शेख अकबर जणू पटेल-[ ३९१ ],गजानन दतात्रय नागरे-[ ३४३ ]
शहर विकास आघाडी मुद्दसर अजगर पटेल -[ ३५६ ],सुमया अलीम मन्सुरी -[४९८ ],गयाबाई रुपचंद प्रधान -[ २९५ ],अब्दुल राउफ मजीद कुरेशी -[३५२ ] ,मोहिनी संदीप काथार ,तर एमयएम कडून =-सय्यद जफरोदिन आफजलोदिन -[ ३१० ] हे निवडून आले आहे
एमआयएमचा प्रवेश फुलंब्री नगर पंचायत मध्ये एमआयएम या पक्षाने प्रवेश केला असून त्यांचा एक नगरसेवक निवडून आला. शेवटच्या दिवशी त्याने एमयएम कडून उमेदवारी आर्ज दाखल केला होता त्याला मतदारांनी स्वीकारले.