लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक लोक काहीही संबंध नसताना आंदोलने, उपोषणे करतात. या लोकांच्या मागे काही शक्ती असतात. या शक्तीच ब्लॅकमेलिंगसाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. याचा परिणाम विद्यापीठाच्या विकासावर होत आहे. एवढेच नाही तर विद्यापीठाचा विकास थांबला असल्याची हतबलता कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली.विद्यापीठात नव्याने सुरूझालेल्या योगशास्त्र विभागाच्या उद्घाटनाला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक येत आहेत. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरूंनी विविध विषयांवर भाष्य केले. नव्याने स्थापन झालेल्या या विभागापूर्वी नाट्यशास्त्र विभागात योगाविषयी पदविका अभ्यासक्रम शिकविण्यात येत होता. या अभ्यासक्रमाला असलेल्या शिक्षकापासून ते मानधनापर्यंत सर्व माहिती एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात मागवली आहे. यानंतर दिलेल्या माहितीवर संंबंधित व्यक्तीचे समाधान झाले नसल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाविषयी कुलगुरूंना विचारले असता, संबंधित व्यक्तीला सर्व ती माहिती देण्यात आलेली असल्याचे योगा विभागाचे समन्वयक व नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी सांगितले. दिलेल्या माहितीवर संबंधितांचे समाधान झाले नसेल तर याविषयी अपिलीय अधिकाºयाकडे अपिलाचा अर्ज केला पाहिजे.याविषयी कोणताही अर्ज न करता थेट उपोषणाला बसला असल्याचे डॉ. शेवतेकर म्हणाले. यानंतर कुलगुरूंनी वेगवेगळ्या आंदोलनाला काही अदृश्य लोक फूस लावतात. आंदोलन पेटवून देतात. नंतर या आंदोलनाचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करतात. हे चुकीचे आहे. आंदोलनकर्त्याला माहीतही नसते की आपला वापर कोण करत आहे. याचा परिणाम विद्यापीठाच्या विकासावर होत आहे. हे मराठवाड्यासाठी चांगले नसल्याची कबुलीही कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्लॅकमेलिंगमुळे विद्यापीठाच्या विकासावर परिणाम -कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:40 PM