लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खळी तांडा परिसरात घडली़तालुक्यातील खळी तांडा येथे १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७़३० वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांनी एका काळविटावर हल्ला चढविला़ यावेळी गंगाधर शिंदे, महादेव गात, नंदू भारती, विष्णू गरड या ग्रामस्थांनी कुत्र्यांना हुसकावून लावत काळविटाची सुटका केली़ त्यानंतर पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांना ही माहिती देण्यात आली़ शिवाजी कनसे, रमेश सुरवसे, शेख पाशा, प्रदीप गौरशेटे आदींच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या काळविटाला गंगाखेड येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ़ श्रीनिवास कारले, डॉ़ मिलिंद गायकवाड यांनी या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना देवून काळविटावर उपचार सुरू केले़ मात्र रात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास या काळविटाचा मृत्यू झाला़ वनरक्षक सीमा राठोड यांनी पंचनामा केला़
कुत्र्याच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:29 PM