खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): लोकसभा निवडणुकीची निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. यातच उमेदवारांनी जिंकून येण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहे. दुसरीकडे निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आज सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वेरूळ येथील प्रसिद्ध बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले.
लोकसभेचा निकाल माझ्याच बाजूला बाजूने यावा यासाठी महादेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केल्याची माहिती खैरे यांनी दिली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा संघटनमंत्री सतीश लोखंडे व माजी उपसभापती विजय भालेराव यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने खैरे यांचे स्वागत करण्यात आले.
हिमालयात जाण्याची देखील विरोधकांची पात्रता नाहीयंदा संभाजीनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी जनता मला देऊ पाहत आहे. मी गंगोत्रीपासून ते घृष्णेश्वरापर्यंत देवदर्शन करत आलेलो आहे. भगवान घृष्णेश्वराचा आशीर्वाद माझ्यासोबतच आहे. जे विरोधक मला हिमालयात पाठवण्याची भाषा करतात त्यांची हिमालयात जाण्याची देखील पात्रता नाही. त्यांचे दारूचे धंदे, गुंडगिरी, अवैध धंदे यातच ते मश्गूल आहेत, असा टोला संदिपान भुमरे यांचे नाव न घेता खैरे यांनी लगावला.