कायगाव : औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी असताना बुधवारी संबंधित विभागाने ट्रॅफिक ब्लिंकर बसविले. यामुळे परिसरातील नागरिकांच्या मूळ मागणीकडे डोळेझाक केली गेली आहे.
औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूरकडे जाणारी वाहतूक आणि पुण्याकडे सरळ जाणारी वाहने भेंडाळा फाट्यावर समोरासमोर येत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची गरज भासू लागली. याबाबत लोकमतनेही वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केला. तर शुभम बोकडिया यांनी याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनीही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याबाबत पत्र देऊन सिग्नल बसविण्याचे सूचित केले होते. तर आठ महिन्यांनंतर बुधवारी ट्रॅफिक ब्लिंकर बसविण्यात आले आहे. सिग्नलची मागणी असतांना फक्त ब्लिंकर बसविण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली.
-----
फोटो : राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाट्यावर सिग्नल मागणी असताना संबंधितांनी ट्रॅफिक ब्लिंकर बसविले.
010921\180-img-20210901-wa0005.jpg
फोटो :
औरंगाबाद -अहमदनगर -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाट्यावर सिग्नलची मागणी असतांना संबंधितांनी फक्त ट्रॅफिक ब्लिंकर बसविले आहे.