शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

रक्ताची नाती दुरावली ! नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 6:08 PM

आपल्याला पत्नी, मुले नसल्याचे सांगताना त्यांना भावना अनावर होत होत्या.

ठळक मुद्देडाॅक्टर, परिचारिका आणि समाजसेवा अधीक्षकांकडून सांभाळनातेवाईक जर नकार देत असतील तर मला आश्रमात सोडून द्या

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : रक्ताचे नातेवाईकच जणू शत्रू म्हणून उभे ठाकल्याने ‘मला आश्रमात सोडा...’ असे म्हणण्याची वेळ घाटीत दाखल एका ६५ वर्षीय वृद्धावर ओढावली. या वृद्धावरील उपचार पूर्ण झाले आहेत. मात्र, रुग्णाचा सांभाळ करण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णाला घाटीतून सुटीही देता येत नाही. सध्यातरी डाॅक्टर, परिचारिका आणि समाजसेवा अधीक्षकच रुग्णाचा सांभाळ करीत आहेत.

हडकोतील रहिवासी नातेवाइकांकडे आपण इतके दिवस राहत होतो, असे ६५ वर्षीय वृद्धाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपल्याला पत्नी, मुले नसल्याचे सांगताना त्यांना भावना अनावर होत होत्या. नातेवाईक जर नकार देत असतील तर मला आश्रमात सोडून द्या, अशीच विनंती ते वारंवार करीत आहेत. ओट्यावरून पडल्याने ५ ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमरेखाली मार लागला आहे. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक १३ मध्ये उपचार करण्यात आले. उपचार पूर्ण झाले आहेत; पण सध्या त्यांना खाटेवरून उठणेही अवघड आहे. एक ते दोन महिने आराम केल्यास ते बरे होतील, असे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांना घाटीत ज्यांनी दाखल केले, त्यांचा मोबाइल बंद आहे. याविषयी सिडको पोलिसांना माहिती देण्यात आली. नातेवाईक येत नसल्याने आता या ज्येष्ठाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हातारपणी जवळचे नातेवाईकही दूर जात असल्याचे पाहून वाॅर्डातील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत आहे.

माता न तू वैरिणी ! प्रसूतीनंतर शिशूला सोडून मातेचे पलायन; परिचारिकांनी दिली मायेची उब

पुनर्वसनासाठी प्रयत्नशीलसदर रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सिडको पाेलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही नातेवाइकांशी संपर्क साधला; पण नातेवाईक सांभाळ करण्यास नकार देत आहे. नातेवाइकांनी रुग्णाला नाकारणे हे चुकीचे आहे.- अनुसया घोगरे, समाजसेवा अधीक्षक, घाटी रुग्णालय

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर