शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भोरखेड्यात ‘खून का बदला खून’

By admin | Published: July 14, 2017 12:32 AM

पारध : भोकरदन तालुक्यातील भोरखेडा येथे तेरा वर्षांपूर्वी विठ्ठल बबन रोकडे यांचा शेतीच्या वादातून खून झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील भोरखेडा येथे तेरा वर्षांपूर्वी विठ्ठल बबन रोकडे यांचा शेतीच्या वादातून खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी विठ्ठल रोकडे त्यांच्या मुलांनी वडिलांना मारणाऱ्या व्यक्तीचा बुधवारी रात्री डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केला. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.पोलीस सूत्रांनी सांगितले, की (रा.भोरखेडा) यांनी २००४ मध्ये विठ्ठल रोकडे यांचा खून केला होता. या प्रकरणी खुनाच्या आरोपात गावातील प्रकाश गंगाराम रोकडे (५५) याने कायदेशीर शिक्षा भोगली आहे. सध्या गावात राहत असलेल्या प्रकाश रोकडे यास विठ्ठल रोकडे यांची मुले दत्ता विठ्ठल रोकडे व लक्ष्मण विठ्ठल रोकडे ‘तू आमच्या बापास ठार मारले आहे, आम्ही तुला संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, अशा धमक्या द्यायचे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित सुशीला रोकडे व त्यांची मुले दत्ता रोकडे, लक्ष्मण रोकडे यांनी संगनमत करून भोरखेडा येथील गट २६१ मध्ये प्रकाश रोकडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून केला. या प्रकरणी प्रकाश रोकडे यांचा मुलगा गणेश याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर पारध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी गुरुवारी घटनास्थळी चौकशी केली. सहायक उपनिरीक्षक सुदाम भागवत तपास करीत आहेत.