शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दाम्पत्याचा विहिरीत मृतदेह आढळला

By admin | Published: January 30, 2017 12:02 AM

तळणी येथील शेतकरी नामदेव गणपत हनवते (७६) व जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचे मृतदेह आईच्या तलावाजवळील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले.

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत जोपर्यंत पोलीस अधीक्षक येणार नाही, तोपर्यत मृतदेह बाहेर काढणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तळणी येथील शेतकरी नामदेव गणपत हनवते (७६) व जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचे मृतदेह आईच्या तलावाजवळील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. सदर प्रकरण शेतीच्या वादातून झाले असल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याच्या नातेवाईकांनी करून आक्रोश केला. याप्रकरणी जोपर्यंत पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह घटनास्थळी येऊन आमची कैफीयत ऐकणार नाही, तोपर्यंत दोघांचे मृतदेह जागेवरून हलवू देणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी भेट दिली. हे प्रकरण शेतीच्या वादावरुन घडल्याचा आरोप करीत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढली. त्यांच्या आश्वासन दिल्यानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आले.