पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील अर्जुन गावंडे हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर पाचोड पाेलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी दुपारी विहामांडवा शिवारातील आनंता काळे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकात त्यांची दुचाकी आढळून आली. यावेळी शेतात शोध घेतला असता, शेताच्या मधोमध असलेल्या एका लिंबाच्या झाडाला अर्जुन गावंडे यांचा मृतदेह लटकलेला आढळून आला. या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली. यावेळी सपोनि अतुल येरमे व पोउनि गोरक्ष खरड हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह झाडावरून खाली उतरवून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास सपोनि अतुल येरमे, पोउनि गोरक्ष खरड, सहाय्यक फौजदार संजय मदने व आप्पासाहेब माळी करीत आहेत.
फोटो आहे.