शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बोगस डॉक्टरांचा औरंगाबाद पोलिसांकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:12 AM

वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगाव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षांपासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने पर्दाफाश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगाव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षांपासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने पर्दाफाश केला. दोन्ही डॉक्टरांच्या ताब्यातून अ‍ॅलोपॅथी औषधांचा मोठा साठा, स्टेथस्कोप, बीपी आॅपरेटर मशीन आणि थर्मामीटर ही उपकरणे जप्त केली.बिपलास तुलसी हलदार (३०, ह.मु. भालगाव, मूळ रा. अंगरेली कॉलनी, बनगाव, जि. २४ परगणा, पश्चिम बंगाल) आणि बिस्वजित कालीपाद बिस्वास (३१, रा. छाईगडिया, ता. बनगाव, जि. २४ परगणा, प. बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बिपलासकडे कला शाखेची पदवी आहे, तर आरोपी बिस्वजित हा केवळ दहावी शिकलेला आहे. असे असताना दोन्ही आरोपी आठ वर्षांपासून भालगाव येथे दवाखाना चालवीत होते.माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भास्करराव दाते यांना सोबत घेऊन मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुकुंदवाडी आणि भालगाव येथील घर आणि दवाखान्यावर छापा मारला. त्यावेळी दोन्ही आरोपींकडे त्यांच्या वैद्यकीय पदवी शिक्षणाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारचे शिक्षण घेतलेच नसल्याची कबुली दिली. शिवाय त्यांच्या बॅगमध्ये विविध कंपन्यांच्या अ‍ॅलोपॅथीच्या गोळ्या, औषधी, इंजेक्शने मिळाली.रुग्णांची तपासणी करण्यासाठी वापरला जाणारा स्टेथस्कोप, रक्तदाब तपासणी यंत्र, तापमापक आदी उपकरणे मिळाली. औषधी आणि उपकरणाचा पंचनामा करून पोलिसांनी ती ताब्यात घेतली. आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक हारुण शेख यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहायक निरीक्षक हारुण शेख, कौतिक गोरे, अस्लम शेख, विजय चौधरी, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांनी केली.दोन बोगस डॉक्टरांना पोलीस कोठडीमुकुंदवाडी परिसरात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाºया बोगस डॉक्टरांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस.ए. राठोड यांनी २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बिपलास तुलसी हलदार (२०) आणि बिस्वजित कालीपाद बिस्वास (३१, दोघेही रा. पश्चिम बंगाल) अशी या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी वरील दोघांना न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील एसएल दास यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींचे आणखी कोण साथीदार आहेत, त्यांच्याकडील औषधी त्यांनी कोठून आणली, याचा तपास करावयाचा आहे. त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.अन्न व औषधी प्रशासनाकडे दिली औषधीजप्त औषधी आरोपींनी कोणाकडून खरेदी केली, तसेच कोणत्याही औषधी विक्रेत्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधी विक्री करता येत नाही असे असताना आरोपींना बेकायदेशीर औषधी विक्री करणारे कोण आहेत, त्याचा शोध घेण्यात येणार आहे. आरोपींकडून जप्त औषधी साठा अन्न व औषधी प्रशासनाकडे देण्यात आला आहे. या विभागाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

टॅग्स :docterडॉक्टरAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस