लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : पहिली ते आठवीपर्यंत सर्व शाळांमध्ये पुस्तके दिल्या जातात. परंतु, कुरूंदा परिसरात यावर्षीही पुस्तकांची बोंब कायम असल्याचे चित्र दिसत असून इयत्ता ९ वीच्या पुस्तकांची बाजारपेठत टंचाई दिसून येत आहे.कुरूंदा भागातील सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. परंतु, दोन ते तीन वर्षांपासून वसमत तालुक्यातील मागील संख्यापटाप्रमाणे पुस्तकांचे वितरण होत असते. यावर्षी मागील संख्यापटाप्रमाणे तालुक्यातील शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण झालेले आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. त्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात कमीच पुस्तके वितरित झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही विषयाचे पुस्तके मिळाली नसून उर्दू माध्यमासह सेमीमध्ये हीच बोंब असून आठवीचे संस्कृतचे पुस्तक विद्यार्थ्यांना मिळालेले नही. यावर्षी ७ वी, ९ वी चे पुस्तकांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे यावेळेस ९ वीव ९ वीचे नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तके आलेली आहेत. शाळांमध्ये ७ वीचे पुस्तके योग्यरित्या मिळाले; परंतु बाजारपेठेत ९ वीच्या पुस्तकांच्या बाबतीत सावळागोंधळच पाहण्यास मिळाला. दोन आठवड्यानंतर बाजारपेठेमध्ये ९ वीचे पुस्तके आले. त्यामुळे अर्धवट पुस्तकांवरच विद्यार्थ्यांना ९ वीचा अभ्यास सुरू करावा लागला.तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत हे भाषा विषयक पुस्तके उशिरा छापल्या गेल्याने भाषा विषयक पुस्तकांची ९ वीच्या पुस्तकांची टंचाई दिसून आली आहे. पुस्तके बदलली की, त्यांचा नेहमी तुटवडा निर्माण होतो. ही नित्याचीच बाब आहे. परंतु, या प्रकारांचा मन:स्ताप मात्र विद्यार्थ्यांसह पालकांना सहन करावा लागतो.
कुरूंदा परिसरात पुस्तकांची बोंब
By admin | Published: June 29, 2017 12:20 AM