शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

१५ जूनपर्यंत दोन्ही उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुले

By admin | Published: June 05, 2016 11:44 PM

औरंगाबाद : जालना रोडवरील बहुचर्चित महावीर चौक, रेल्वेस्टेशन रोड आणि वसंतराव नाईक चौक, सिडको हे दोन्ही उड्डाणपूल १५ जूनपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले होण्याचे संकेत उपअभियंता उदय भरडे यांनी दिले.

औरंगाबाद : जालना रोडवरील बहुचर्चित महावीर चौक, रेल्वेस्टेशन रोड आणि वसंतराव नाईक चौक, सिडको हे दोन्ही उड्डाणपूल १५ जूनपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले होण्याचे संकेत उपअभियंता उदय भरडे यांनी दिले. पथदिवे आणि स्ट्रीट गाईड पॅच मारण्याचे काम बाकी आहे. ते काम या आठवड्यात संपेल. त्यानंतर १५ जूनपर्यंत पूल खुला होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. अडीच वर्षांपासून त्या पुलांचे काम सुरू आहे. महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम झाले असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाचे काम अजून बाकी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आणि मनपात भूसंपादनावरून सध्या पत्रव्यवहार सुरू आहे. रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक या रोडवर तो पूल बांधण्यात आला आहे. मुळात वाहतुकीचा रेटा हा नगरनाका ते जालना रोड या दिशेने होता. त्यामुळे पूल या दिशेने बांधला जावा, अशी मागणी पुढे आली. या मागणीसाठी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली; परंतु पुलाची दिशा बदलली नाही. सिडकोउड्डाणपुलाची लांबी वाढण्याच्या वादामुळे ते काम रखडले. मंजूर आराखड्याइतकेच काम करण्याचे ठरल्यानंतर पुलाचे काम झाले. या पुलामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे सध्या तरी वाटत नाही. अतिशय किचकट अशा स्वरूपाची वाहतूक व्यवस्था सध्या नाईक चौकात पाहण्यास मिळते. राष्ट्रवादीचा इशाराराष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित देशमुख यांनी सात दिवसांत पूल वाहतुकीला खुला न केल्यास अनाथ मुलांच्या हस्ते पूलाचे उद्घाटन करण्याचा इशारा एमएसआरडीसीला निवेदनातून दिला आहे.