छत्रपती संभाजीनगर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगापुर तालुक्यात विकास कामांचे उद्घाटनाकहा कार्यक्रम आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केला होता.मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी कामगार कल्याण किटची पळवापळवी केल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे येथे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या विकास कामांचा कार्यक्रम बाजूला राहून लाभार्थी किटची पळवापळावीचीच चर्चाच सुरू झाली.
गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद आरापुर शिवारात गंगापूर उपसा जलसिंचन योजना १'चे उद्घाटन आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना किट देण्याचे नियोजन होते. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी पत्रे उचकटून कामगार कल्याण किटचे खोके आणि पेट्या पळवल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला.
नियोजनानुसार फडणवीस यांच्या हस्ते कामगार कल्याण किटचे वाटप होणार होते. त्यासाठी लाभार्थी यांना टोकन देखील देण्यात आले होते. मात्र अचानक काही नागरिकांनी किट पळविल्या. आरोग्य, कामगार आणि खेळाडूसाठीच्या वेगेवेगळ्या किटची पळवापळावी सुरू होताच नागरिकांनी गर्दी केली. हाती येईल त्या किट घेऊन नागरिकांनी तेथून पळ काढला.
ते तर पाठीत खंजीर खुपसणारे दरम्यान, यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षांच्या काळातील सरकारने जलयुक्त शिवारच्या पाठीत खंजीर खुपसला,मराठवाडा वाटर ग्रीडच्या पाठीत खंजीर खुपसला,समृद्धी महामार्गाच्या पाठीत खंजीर खुपसला. यासह प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आधीच्या सरकारने केले. मी मुख्यमंत्री असतो तर हे केले असते ते केले असते असे राज्यात एक व्यक्ती रोज सांगतो. मात्र अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री केले तेव्हा आपण घरात बसून होता. आताही तुम्ही घरी बसून निंबध लिहा अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस यांनी केली यावेळी केली.