शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतची निवडणूक ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या होणाºया निवडणूकीवर काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी औंढा यांच्याकडे दिले आहे.शिरडशहापूर येथील बसस्थानक ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या नसल्याने घरातील पाणी, सांडपाणी व संडासचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच पाण्यामुळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे तर डासांमुळे रोगाचे प्रमाण वाढले आहे. १५.२० दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला, हिवताप आदी रोगाची लागण लागली आहे. प्रत्येक घरातील मुल हे तापाने फणफणत आहे. याबाबत वारंवार निवेदन व तोंडी सांगूनसुद्धा कोणीच दखल घेतली नसल्यामुळे नाईलाजास्तव मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. हा भाग वार्ड क्र. १, ३ मध्ये समाविष्ट झालेला आहे. रस्त्यावरील घाण पाणी बंद करत नाही तोपर्यंत ठाम निर्णय घेण्यात आला आहे.निवेदनावर आनंद ठेंबरे, विशाल सागर, प्रकाश पवार, नितीन खेबाळे, विष्णू गोरे, गंगाधर जाधव, बालाजी लुटे, सरस्वती विभुते, चंद्रहार वाहदुळे, दुधाजी ढेंबरे, नवनाथ पटवे, गणेश राचमले आदी जणांच्या स्वाक्षºया आहेत.
शिरडशहापूर येथे निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:03 AM