औरंगाबाद : ‘गीताबाई काय करता?’ असे विचारत जवळ आलेल्या चोरट्याने ५५ वर्षीय कमलबाई मारोती पाटेकर यांच्या गळ्यातील मिनी गंठणला एक हात घातला. दुसऱ्या हाताने त्यांचे तोंड दाबले. बेसावध असूनही कमलबार्इंनी एका हातात गळ्यातील गंठण घट्ट पकडल्याने चिडलेल्या चोरट्याने त्यांना चाकू दाखवून हात पिरगाळला व खाली पाडून सव्वादोन तोळ्याच्या गंठणला हिसका दिला. तरीही न डगमगता कमलबार्इंनी हातातील गंठण न सोडल्याने चोरटा केवळ पाच ते सात ग्रॅमचा गंठणचा तुकडा घेऊन साथीदारांसह सुसाट पळून गेला. त्यानंतरही कमलबार्इंनी हातात दगड घेऊन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शनिवारी (दि.२) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सिडको एन-५ येथील सत्यमनगरात घडली.कमलबाई पाटेकर (रा. सत्यमनगर) या शनिवारी सकाळी अंगणातील झाडांना पाणी देत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघांपैकी एक जण त्यांच्याजवळ आला आणि गीताबाई असा आवाज दिला. कमलबार्इंचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याने डोक्यावरील हेल्मेट काढण्याचे नाटक केले. मात्र हेल्मेट न काढताच त्याने एका हाताने कमलबार्इंच्या चेहºयावर जोराने फटका मारला आणि नाक तोंड दाबले. दुसºया हाताने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणाला हात घातला. प्रसंगावधान राखून कमलबार्इंनी गंठण घट्ट पकडून ठेवल्याने चोरट्याचे काही चालेना. तोंड दाबल्याने त्यांना ओरडताही येत नव्हते. तरीही न घाबरता मोठ्या धैर्याने कमलबार्इंनी गंठणाची मूठ सैल होऊ दिली नाही. गंठण सोडत नसल्याचे पाहून चोरट्याने त्यांना खाली पाडले आणि दुसºया हाताने खिशातील चाकू काढला. परंतु चाकूला न घाबरता त्यांनी मदतीसाठी धावा केला. त्या आवाजामुळे घराच्या वरच्या मजल्यावर त्यांच्या पतीसह गप्पा मारत बसलेले लोक धावल्याने चोरटा गंठणला हिसका देऊन पळाला. तेथे बाजूलाच थांबलेल्या दुसºया साथीदाराच्या दुचाकीवर बसून चोरटा सुसाट जळगाव रोडच्या दिशेने निघून गेला. घटनेत चोरट्याच्या हाती एकूण गंठणाच्या पाव टक्के हिस्साच लागला.चौकटचोरटे सीसीटीव्हीत कैदया घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पो.निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भरत पाचोळे, कर्मचारी नरसिंग पवार, जगदीश खंडाळकर, लोदवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाल्याचे त्यांना दिसले.
धाडसी कमलबाईने केले मंगळसूत्र चोरट्याशी दोन हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:50 PM
‘गीताबाई काय करता?’ असे विचारत जवळ आलेल्या चोरट्याने ५५ वर्षीय कमलबाई मारोती पाटेकर यांच्या गळ्यातील मिनी गंठणला एक हात घातला. दुसऱ्या हाताने त्यांचे तोंड दाबले. बेसावध असूनही कमलबार्इंनी एका हातात गळ्यातील गंठण घट्ट पकडल्याने चिडलेल्या चोरट्याने त्यांना चाकू दाखवून हात पिरगाळला व खाली पाडून सव्वादोन तोळ्याच्या गंठणला हिसका दिला. तरीही न डगमगता कमलबार्इंनी हातातील गंठण न सोडल्याने चोरटा केवळ पाच ते सात ग्रॅमचा गंठणचा तुकडा घेऊन साथीदारांसह सुसाट पळून गेला. त्यानंतरही कमलबार्इंनी हातात दगड घेऊन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शनिवारी (दि.२) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सिडको एन-५ येथील सत्यमनगरात घडली.
ठळक मुद्देपोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी पळविण्याच्या दोन घटना