छत्रपती संभाजीनगर : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सर्व भागांत कमी-अधिक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाने ब्रेक घेतला आहे. तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले असून, जनसामान्य घामाघूम होत आहेत.
जिल्ह्यात १५ जून रोजी सकाळपर्यंत १०.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजवर १४५.३ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाल्याचे आकडे सांगत आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५८१.७ मि.मी. आहे.
जिल्ह्यात आजवर झालेला पाऊसतालुका.........................पाऊसछत्रपती संभाजीनगर........१३९ मि.मीपैठण.................१६८ मि.मी.गंगापूर..............१३८ मि.मी.वैजापूर...............१२३ मि.मी.कन्नड..............१५६ मि.मी.खुलताबाद............१६१ मि.मी.सिल्लोड ............१३७ मि.मी.सोयगाव.............१२६ मि.मी.फुलंब्री..............१८० मि.मी.एकूण.........१४५.३ मि.मी.
वाऱ्याचा वेग मंदावलाकोकणातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कमी राहील. परिणामी, तापमान वाढत आहे. हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेल्यामुळे दुपारी पाऊस येईल, अशी चिन्हे होती; परंतु वाऱ्याचा वेग कमी असल्याने पाऊस आला नाही. कमाल तापमान ३६, तर किमान तापमान २९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.- श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक