शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

टपरी फोडणे जीवावर बेतले; चोरी करण्यासाठी गेला अन् भाजून जखमी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:23 IST

टपरीची वीज बंद असल्यामुळे उजेडासाठी चोरट्याने पुठ्ठा पेटवताच अचानक सॅनिटायझरचा भडका उडाला.

ठळक मुद्देपोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्याचा जीव वाचला  

औरंगाबाद : चोरी करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला शनिवारी रात्री चांगलीच अद्दल घडली. दोन चोरट्यांनी टपरीची फळी उचकटली व एक जण आत घुसला. मात्र, टपरीची वीज बंद असल्यामुळे उजेडासाठी त्याने पुठ्ठा पेटवताच अचानक सॅनिटायझरचा भडका उडाला. बघता बघता टपरीतील सामानाने पेट घेतला आणि आत अडकलेला चोरटा आगीत भाजल्याने जोरजोरात ओरडू लागला. तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला बाहेर काढून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

ही घटना शनिवारी उशिरा रात्री शाहनूरमियाँ दर्गा चौकातील डीमार्टसमोर घडली. दरम्यान, टपरीला आग लागताच बाहेर असलेल्या साथीदाराने तेथून धूम ठोकली. या घटनेत १३ वर्षीय चोरटा ३० टक्के भाजला आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता टपरीमालक शेख फैयाज शेख हमीद हे टपरी बंद करून घरी गेले. बारा वाजेच्या सुमारास भारतनगर येथील रेकॉर्डवरील अल्पवयीन दोन सराईत चोरट्यांनी डीमार्टसमोरील टपरीची फळी उचकटून आत प्रवेश केला. एक जण बाहेर थांबला, तर आत गेलेल्या दुसऱ्या चोरट्याने टपरीत अंधार असल्याने पुठ्ठा पेटवला. त्यावेळी टपरीतील सॅनिटायझरचा एकदम भडका उडाला. या आगीत टपरीतील मास्क, रुमाल, फळ्या, माचिस, बिडी, सिगारेट आदींनी पेट घेतला. बघता बघता आग भडकल्याने चोरट्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसेना. त्यामुळे तोही या आगीत होरपळला. 

योगायोगाने त्यावेळी तेथून गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर निघाले होते. त्यांनी हा प्रकार बघितला. आतून किंचाळण्याचा आवाजही ऐकला. त्यामुळे पोलिसांचे पथक तेथे थांबले व त्यांनी तात्काळ जवाहरनगर पोलिसांना ही घटना कळवली. माहिती मिळताच हवालदार निकम आणि बीट मार्शल सय्यद फहीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत टपरीमधील चोरट्याला बाहेर काढले. यात त्याचे दोन्ही हात, पाय आणि तोंड भाजले होते. भाजलेल्या अवस्थेत त्यास घाटीत दाखल केले. आगीत टपरीतील माल आणि टपरी, असा एकूण ३० हजारांचा ऐवज जळून खाक झाला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद