वाळूज महानगर: दिवाळी सणाची धामधूम सुरु झाली असून, वाळूज उद्योनगरीतील यंत्राच्या धडधडीला बुधवारपासून पाच दिवस ब्रेक लागणार आहे. कामगारांना दिवाळी सणासाठी पाच दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या असून, दिवाळी व भाऊबीज झाल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून कारखान्यातील यंत्रांची चाके पुन्हा गरगरणार आहे.
आशिया खंडात नावाजलेल्या वाळूज औद्योगिकनगरीत देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कामगार रोजगारांच्या शोधात उद्योगनगरीत स्थायिक झाले आहेत. उद्योगनगरीत जवळपास ३ हजार ५०० हजार लहान-मोठ्या कंपन्या असून, या कंपन्यांत जवळपास १ लाख कामगार काम करतात.
त्यामुळे कायमस्वरुपी कामगारांचे बजाजनगर, सिडको वाळूजमहानगर, साऊथसिटी, रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, पंढरपूर, पाटोदा, नायगाव, बकवालनगर, नारायणपूर, वाळूज, वडगाव, वळदगाव, साजापूर आदी ठिकाणी वास्तव्य आहे. याच बरोबर कंत्राटी असलेले कामगारांनी या भागात रुम किरायाने घेऊन कुटुंबियासमेवत वास्तव्यास आहेत.
वर्षातील महत्वाचा असलेला दिवाळी सण कुटुंबायासमवेत साजरा करण्यासाठी बहुताश कामगार मुळगावी जात असतात. त्यामुळे उद्योजक मंडळी दसरा संपताच वर्क आॅर्डर पूर्ण करण्यासाठी नियोजन करुन आवश्यक साहित्य व मालाचा साठा करुन ठेवतात. यंदाच्या दिवाळीला कायमस्वरुपी कामगारांना कंपन्याकडून भरघोस बोनस देण्यात आला आहे.
नामांकित बजाज आॅटो कंपनीकडून कामगारांना दिवाळीसणासाठी २२ हजार ७६० रुपयांचा बोनस दिल्यामुळे कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. या शिवाय इतर बड्या कंपन्याकडून शासनाच्या नवीन नियमानुसार कामगारांना बोनस देण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराकडून नाममात्र बोनस दिल्यामुळे कंत्राटी कामगारात नाराजीचा सूर आहे. दिवाळीसणासाठी बोनस व वेतन एकत्रच मिळाल्यामुळे कामगारवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत असून विविध व्यवासायिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे..................................................................................कंपन्यांत होणार देखभाल व दुरुस्तीवाळूज उद्योगकनगरीतील बजाज आॅटो कंपनीकडून कामगारांना दिवाळीसणाठी पाच दिवसाची सुट्टी जाहिर करण्यात आली आहेत. या कंपनीकडून रविवारची साप्ताहिक सुट्टी भरुन घेण्यात आली असून, १२ नोव्हेंबरपासून या कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरु होणार आहे. दरम्यान, काही कंपन्यांतील मशनरी बंद ठेवता येत नसल्यामुळे सुट्टीच्या दिवशीही या कंपन्या सुरु राहणार असून, मात्र उत्पादन केले जाणार नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या सुट्टीच्या कालावधीत काही कंपन्याकडून देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते.
गस्त वाढविण्याची मागणीदिवाळीसाठी जवळपास आठवडाभर कारखाने बंद राहणार असल्यामुळे या कालावधीत चोºया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाढीव गस्त सुरु करावी, यासाठी पोलिस प्रशासनाला मंगळवारी पत्र दिले जाणार असल्याचे मसिआचे राहुल मोगले, अब्दुल शेख, अनिल पाटील आदींनी सांगितले. याच बरोबर उद्योगनगरीत असलेल्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे सुरु ठेवावेत, यासाठी एमआयडीसी प्रशासनाला यापुर्वीच संघटनेतर्फे पत्र देण्यात आले आहे.-----------------------------------