शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:00 AM

: बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे. या बदलामुळे पालिकेतील राजकारणाचे वेगळे चित्र लवकरच स्पष्ट होईल.बीड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह ५१ नगरसेवक आहेत. यामध्ये काकू-नाना आघाडीचे २०, राष्ट्रवादीचे १८, एमआयएम ९, शिवसेना २, तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सत्ता स्थापनेसाठी आघाडीने एमआयएम स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांची मदत घेतली. त्यानंतर उपनगराध्यक्षासह सभापतीपदे आपल्या ताब्यात घेतली; परंतु नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीमुळे आघाडीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काकू-नाना आघाडीचे नेते संदीप क्षीरसागर यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचा व काका तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होत होते. या दोघांच्या वादात शहराचा विकास खुंटल्याचा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पालिकेतील राजकारण वेगवेगळ्या चर्चेने ढवळून निघाले आहे. अखेर बुधवारी रात्री एमआयएम स्वतंत्र गटाच्या शेख मोहंमद खालेद, शेख जफर सुलताना बशीर, मोमीम अजरोद्दीन, अहेमद नफिसा खातून, रूखय्या बेगम नसीरोद्दीन या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत विकासाच्या नावाखाली हात मिळवणी केली. या पाच नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.शिवसेनेने उर्दू फलक हटवलाबीड : जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या विशेष सभेत ठराव घेऊन पालिकेच्या इमारतीवर नगर परिषद नावाचा उर्दू फलक काकू-नाना आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी लावला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. बुधवारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी फलकाबद्दल संताप व्यक्त केला होता. गुरुवारी दुपारी शिवसेनेचे कार्यकर्ते नगरपालिकेत दाखल झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या सोबत चर्चा करून फलक हटविण्याची मागणी केली. याच दरम्यान शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका इमारतीच्या दुसºया मजल्यावर जाऊन, बल्ब, ट्यूबची तोडफोड करून इमारतीवरील फलक काढून टाकला.पालिकेतील राडा पाहून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपनिरीक्षक घनशाम पाळवदे, सुलेमान सय्यद यांच्यासह फौजफाटा पालिकेत दाखल झाला. परिस्थिती पाहून सायंकाळपर्यंत दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.याबाबत मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर म्हणाले, हा फलक पालिकेने लावलेला नव्हता; परंतु पालिका हद्दीत येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप म्हणाले, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राज्यभाषा मराठी असताना अचानक उर्दू भाषा आली कुठून? आणि या भाषेचा फलक नगर परिषदेवर लावण्याचा अट्टहास का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जगताप यांनी पालिकेतील राजकारणावर कडाडून टीका करीत मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.