औरंगाबाद : गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाºया पाण्याला सायंकाळी अचानक ब्रेक लावण्यात आला. १७ दलघमी म्हणजे ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. प्रत्यक्षात अवघा २ दलघमी विसर्ग केल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले.गंगापूर धरणातून सकाळी १० वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झाली. प्रारंभी २ हजार ११२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यात दुपारी वाढ करून ३ हजार ५२४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. सकाळी १० वाजेपासून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सायंकाळी ६ वाजेपर्यंत कायम होता. परंतु सायंकाळी अचानक पाणी सोडणे थांबविण्याचा आदेश गंगापूर धरणावरील अधिकाºयांपर्यंत येऊन धडकला. जिल्हाधिकाºयांनी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण केले आहे. पाणी सोडल्यास आगामी कालावधीत पाण्याची तूट निर्माण होईल आणि नाशिक शहराला टंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हे आदेश देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडणे थांबविण्यात आले. त्यामुळे जायकवाडीस मिळणाºया पाण्यात घट होणार आहे. पाणी का थांबविण्यात आले, यासंदर्भात माहिती प्राप्त झालेली नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.------------
गंगापूर धरणातून येणाऱ्या पाण्याला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 10:52 PM
गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाºया पाण्याला सायंकाळी अचानक ब्रेक लावण्यात आला. १७ दलघमी म्हणजे ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. प्रत्यक्षात अवघा २ दलघमी विसर्ग केल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले.
ठळक मुद्देकेवळ २ दलघमीचा विसर्ग : सकाळी सोडले अन् संध्याकाळी बंद