लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ‘भारत रत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे आदी बहुजन महापुरूषांचे विचार सर्व समाजातील शेवटच्या टोकापर्यंत पोेहोंचविण्यासाठी बौद्ध, मातंग व बहुजनांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेडच्या ‘सिडको व हडको’ परिसरातील बौद्ध, मातंग आणि बहुजन समितीच्या वतीने १९ आॅगस्ट रोजी नवीन नांदेडातील कामगार कल्याण केंद्रात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची ९७ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांची, तर प्रमुख अतिथी म्हणून आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर व स्वारातीम विद्यापीठातील परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे उपस्थित होते.याप्रसगी मंचावर नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती विनय पाटील गिरडे, माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील, उपसभापती प्रा. डॉ. ललिता शिंदे-बोकारे, नगरसेवक अनुक्रमे संजय मोरे, वैजयंती गायकवाड, डॉ. करूणा जमदाडे व उदय देशमुख यांच्यासह दलितमित्र अनुक्रमे गौतम गजभारे, के. एन. बोराळे, माधवराव आंबटवार व शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ देशमुख उपस्थित होते.खा. चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठेंच्या क्रांतिकारी विचारांचा संदेश जगभरात पोहोंचविण्याचे कार्य बौद्ध, मांतग आणि बहुजन समितीच्या माध्यमातून होत आहे. यापुढेही मातंग, बौद्ध व बहुजन समितीतील पदाधिकाºंयानी सुरू केलेले कार्य अविरतपणे करावे, आम्ही त्यांच्या नेहमी पाठिशी राहू, अशी ग्वाही दिली. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून म. फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी केली आहे.
तळागाळापर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवा-अशोकराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:32 AM