सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) सर्रासपणे दलालच कारभारी बनल्याचे समोर आले आहे. कार्यालयीन कामकाजात दलाल हस्तक्षेप करून कागदपत्रांची ुउचकापाचक करीत आहेत. दुसºया बाजूला मात्र सर्वसामान्यांना एका स्वाक्षरीसाठी तासन्तास खिडकीबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे.आरटीओ कार्यालयाच्या बाहेर यात्रा भरल्याप्रमाणे दलालांचा गोंधळ पाहावयास मिळतो. या दलालांना आरटीओ कार्यालयातून अभय मिळत असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून केला जात आहे. एखादा कागद काढायचा म्हटले तर त्यासाठी चक्क दलालामार्फत येण्याचा सल्ला येथील अधिकारी देत असल्याचे सुनील काळे या नागरिकांने सांगितले. माझ्या कागदपत्रांत किरकोळ त्रुटी काढून अनेक वेळा खेटे मारण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘एआरटीओ’त दलालांचे राज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:33 AM