शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

दीर-भावजयीने एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण; भररस्त्यात विष प्राशन करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 1:51 PM

‘एक दुजे के लिये’ची चर्चा : बदनापूर तालुक्यातील जोडप्याचे करमाडला आढळले मृतदेह

करमाड (जि. औरंगाबाद ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर चक्कर येऊन कोसळलेल्या युगुलाने एकमेकांना मिठीत घेत जीव सोडला. वर्दळीच्या जालना रोडवर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दोघे मृत युगुल नात्याने दीर, भावजय असल्याचे समोर आले.

हिवरा राळ, (ता. बदनापूर) येथील काकासाहेब बबन कदम (वय ३२) व सत्यभामा अशोक कदम (२७) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जालना रोडने झोकांड्या खात एक पुरुष व महिला येत असताना लोकांनी पाहिले. काही क्षणात या त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व ते रस्त्यावर कोसळले. त्यांना वांत्याही होत होत्या. बघ्यांनी ही माहिती त्वरित पोलिसांना कळविली. तोपर्यंत ते जोडपे रस्त्यावर हातपाय खोडत तडफडत होते. त्यांचा मोबाईलही बाजूलाच पडलेला होता. पोलिसांनी मोबाईलवरून शोध घेत त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

पोलिसांनी सांगितले, जालना जिल्ह्यातील ही महिला व तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. सत्यभामा कदम या गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्या झाल्या होत्या. बहिणीचा शोध लावण्यात करमाड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी यश आले होते. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांचा शोध घेत होते. सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. बघ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली व त्याच अवस्थेत ते पडून होते. उलट्या झाल्यानंतर त्यांना झटके येत होते. उलट्या झाल्यानंतर तेथे विषारी दर्पही पसरला होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंग जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. शेख अनिस हे तत्काळ १०८ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीमध्ये उपचारांसाठी दाखल केले.

मोबाईलमुळे पटली ओळख...पोलीस घटनास्थळी आल्यावर काही अंतरावर मोबाईल पडलेला होता. त्यावरून त्यांची ओळख पटली. परंतु मोबाईलमध्ये अजून काय रेकार्डिंग आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

दोघांचेही भरलेले कुटुंबकाकासाहेब कदम हे शेती करून मालवाहू वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सत्यभामा कदम या गृहिणी होत्या. यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुले असा परिवार आहे. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील व पोना विजयसिंग जारवाल हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद