शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

दीड हजार कुटुंबियांना भाऊबीज भेट

By admin | Published: November 14, 2015 12:03 AM

बीड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून शिवसेना गोरगरीब कुटुंबियांसाठी पुन्हा एकदा धावून आली.

बीड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून शिवसेना गोरगरीब कुटुंबियांसाठी पुन्हा एकदा धावून आली. शुक्रवारी दीड हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून शिवसेनेने भाऊबीजेची अनोखी भेट दिली.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची विशेष उपस्थिती होती. सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, आ. संजय सिरसाट, अंबादास जानवे, सुधीर पाटील, राजू वैद्य, वैभव पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची यावेळी उपस्थिती होती.दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या पणत्या, साबणापासून ते तेलसाखरेपर्यंतच्या डझनभर वस्तूंचे वाटप दीड हजार जणांना करण्यात आले. एका लाभार्थ्यास साधारणपणे तीन हजार रूपयापर्यंतच्या वस्तू देण्यात आल्या. यावेळी मंत्री कदम यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत शिवसेना पाठीशी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्याला आत्महत्येचा कलंक लागला आहे. तो धुवून काढण्यासाठी शिवसेना यापूर्वी देखील धावून आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर मदतीसाठी लाखोंची रक्कम उभी केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना धीटपणे करावा लागेल. आत्महत्या हा पर्याय नाही. शिवसेना सोबत असताना संकटांना घाबरता कशाला ? असा धीरही त्यांनी दिला. बीड व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी यापुढे देखील प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संकटात सापडलेल्या सोन्यासारख्या माणसांना शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या घरात सेनेचा दीवाबीडमधील शेतकऱ्यांच्या भेटीला अनेकजण हात हलवित आले आणि गेले. प्रत्यक्ष मदत घेऊन फक्त शिवसेना आली, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या घरामध्ये दीवा पेटविण्याचे काम केवळ शिवसेनेने केलेले आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.शिवसेनेची मदत सार्थकीबीडमध्ये भीषण दुष्काळ आहे. मदतीसाठी निवडलेले लाभार्थी आर्थिक खाईत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेने केलेली मदत सार्थकी ठरल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी केले.इतरांना जाणीव नाहीजिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मार्गदर्शन करताना विरोधकांवर टीकेची झोड उठवली. बीडमध्ये मोठे नेते आहेत, मात्र त्यांच्यात दानत नाही. शिवसेना संवेदनशील असून, गोरगरीबांना आधार देण्याचे काम केले आहे. यापुढेही शिवसेनाच मदतीला येईल. (प्रतिनिधी)