नांदेड : बीएसएफ जालंधर संघाने अंतिम सामन्यात नाशिक संघावर विजय मिळवताना अखिल भारतीय श्री गुरू गोविंदसिंघजी सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेत चॅम्पियनचा बहुमान मिळवला. नॉदर्न रेल्वे संघाला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.अतिशय वेगवान आणि चुरशीच्या ठरलेल्या अंतिम फेरीत दोन्ही संघ निर्धारित वेळेत १-१ असे बरोबरीत होते. बीएसएफतर्फे कव्हरपालसिंगने, तर नाशिककडून बुद्धराम धोंधारी याने गोल केला. निर्धारित वेळेत निर्णय लागू न शकल्याने अखेर शूटआऊट प्रणालीत बीएसएफ जालंधरने नाशिकचा ४ विरुद्ध ३ गोलफरकाने पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.तिसºया क्रमांकासाठी झालेला दिल्ली विरुद्ध कर्नाल हॉक्स हरियाणा यांच्यातील सामनाही निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत होता. दिल्लीकडून सुखमंतसिंगने, तर कर्नाल संघाकडून राहुलने गोल केला. या सामन्याचा निकालही शूटआऊट प्रणालीद्वारे काढण्यात आला. त्यात दिल्लीने ४ विरुद्ध ३ गोलने विजय मिळवताना तिसरे स्थान मिळवले.अंतिम सामन्यास संतबाबा बलविंदरसिंघजी आवर्जून उपस्थित होते. नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, आ़ डी. पी. सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, मनपा सभागृह नेते विरेंदरसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, अब्दुल शमीम, डी. पी. सिंघ, तहनसिंग बुंगाई, नगरसेवक अमित सिंह तेहरा, आनंद चव्हाण, प्रकाश कौर खालसा, श्रीनिवास जाधव, गुरमितसिंघ नवाब यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. आ़ अमरनाथ राजूरकर यांनी आणि आ़ डी.पी. सावंत यांनी आमदार निधीतून दोन-दोन लाख दिल्याचे जाहीर करून पुढच्या वर्षी तीन लाख निधी देण्याचे घोषित केले.बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक प्रा. जुंझारसिंग शिलेदार यांनी केले, तर जसपालसिंघ काहलो आणि खेमसिंघ यांनी सूत्रसंचालन केले. गुरमितसिंघ नवाब यांनी आभार मानले. उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिंदरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलो, अमरदीपसिंघ महाजन, जसबीरसिंघ चिमा, विजय नंदे, दीपसिंग फौजी यांनी अतिथींचे सत्कार केले.पंच म्हणून राजकुमार झा, प्रेयस के.जी., मोहंमद रिझवान, इंदरपाल सिंघ, दर. खालिद हुसेन, प्रदीप एम.जी.पी. यांनी पहिले.
बीएसएफ जालंधर संघ ठरला चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:43 AM