वाळूज महानगर : विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाºयांनी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी वाळूजबीएसएनएल कर्मचाºयांनी शहीद जवानांना श्रद्धाजली अर्पण करुन या संपात सहभागी झाले.
खाजगी कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी बीएसएनएल कंपनी बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी केला आहे. शासनाकडून खाजगी कंपन्यांचे हित जोपासत बीएसएनएलला सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाºयांनी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. यावेळी कर्मचाºयांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला.
या प्रसंगी अजय मोहिते, कैलास पाटील, पोपटराव आदीक, गोरक्ष कुंटे, गोकुळ आहेर, नारायण रोठे, द्वारकाबाई जोशी, विठ्ठल इंगळे, रघुनाथ चन्ने, संतोष गडकर, सतीश चिंचोलकर, अंबादास चव्हाण, बाळूराम पठाडे, सुभाष म्हस्के, लक्ष्मण सोनवणे, सुरेश गायकवाड, आसाराम कसारे आदीसह अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.