शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा

By संतोष हिरेमठ | Published: May 05, 2023 12:33 PM

अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात आणि परिसरात हजारो वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक लेण्यांचा ठेवा आणि वारसा आहे. या लेण्यांमधून दररोज हजारो पर्यटकांना तथागत गौतम बुद्धांचे दर्शन घडते आहे. बौद्ध धम्माचा संदेश यातून शतनानुशतके दिला जातो आहे. हा वैचारिक व सांस्कृतिक ठेवा हजारो वर्षे टिकून राहतील, यादृष्टीने संवर्धनासाठी सर्व स्तरांतून प्रयत्नही केले जात आहे.

अजिंठा लेणीजागतिक वारसा अजिंठा लेण्यात गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या कलेचा अनोखा अविष्कार पाहायला मिळतो. विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे लेण्यांची निर्मिती केलेली आहे. या लेण्यांमधील भिंती आणि छतांवरील चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनावरील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण पाहायला मिळते.

वेरूळ लेणीजगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बुद्ध मूर्तीवर दरवर्षी मार्च महिन्यात अद्भुत किरणोत्सव होतो. हा किरणोत्सव डोळ्यांत साठवण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना असलेल्या वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेण्या आहेत. त्यातील दहा नंबरच्या लेणीवर उत्तरायणात सूर्यकिरणे येतात आणि बुद्धमूर्ती उजळून निघते.

बुद्ध लेणीछत्रपती संभाजीनगर शहरातील बीबी का मकबरापासून जवळपास किलोमीटर अंतरावर बुद्ध लेणी आहे. ही बुद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. त्यात लेण्यांची संख्या १२ इतकी आहे. अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेणींचा संबंध लावला जातो.

घटोत्कोच लेणीसिल्लोड तालुक्यातील अंभई गावापासून सात ते आठ किलो मीटरवरील जंजाळा गावाच्या उत्तरेस अजिंठा डोंगररांगेत ५०० मीटर अंतरावर घटोत्कोच ही बुद्ध लेणी कोरलेली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या अजिंठा लेणीच्या तुलनेत ही लेणी फारशी परिचित नाही. घटोत्कोच बुद्ध लेणी अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असून, पाहण्यासारखे ठिकाण आहे.

पितळखोरा लेणीजिल्ह्यातील कन्नडजवळील गौताळ अभयारण्यात आद्य लेणी असलेल्या पितळखोरा लेणीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. साधारण इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील या लेणीवर इ.स.च्या दुसऱ्या शतकात उपलब्ध असलेल्या जागेतून महायान/ महासांघिक पंथाने लेणीच्या स्थापत्य शिल्पकलेतून आपल्या मान्यता न मांडता भित्तिचित्रे तयार करून घेतली. विशेष म्हणजे अजंठा लेणीतील भित्तिचित्रांच्या आधीची ही भित्तिचित्रे आहेत. यात सम्यक समबुद्ध व बोधिसत्त्व यांना सुंदरपणे चितारण्यात आले आहे. तीन प्रकारची भित्तिचित्र ही या लेणीचे वैशिष्ट्य, मुख्य चैत्यगृहातील प्रदक्षिणा पथाच्या डाव्या बाजूस पांढऱ्या रंगाचे चीवर परिधान केलेले सम्यक समबुद्ध यांचे भित्तिचित्र आहे. याच ठिकाणी आपल्याला मुचलिलंद नागाचे, तसेच बोधिसत्त्वदेखील उत्कृष्टरीत्या चितारलेले पाहायला मिळतात, असे लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांनी सांगितले. 

९९ टक्के लेण्यांमध्ये शिल्प, चित्रजवळपास ९९ टक्के लेण्यांमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती, शिल्प अथवा चित्र पाहायला मिळतात. वेरुळ येथील १० नंबरच्या लेणी सुंदर अशी बुद्ध मुर्ती आहे.- डाॅ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा