शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अर्थसंकल्प केवळ कागदावरच; ३६ कोटीचा निधी आहे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:06 PM

दलित वस्ती सुधार योजना व जि. प. उपकरातून राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सध्या जवळपास ३६ कोटी रुपयांचा निधी या विभागाला मिळाला आहे.  ‘मार्च एण्ड’साठी अवघे दोनच महिने उरलेले असताना अद्यापही प्राप्त निधीतून छदामही खर्च झालेला नाही, हे विशेष!

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्ण वेळ अधिकारीच नसल्यामुळे यंदा या विभागाचा मंजूर अर्थसंकल्प कागदावरच दिसतो. लित वस्ती सुधार योजना व जि. प. उपकरातून राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सध्या जवळपास ३६ कोटी रुपयांचा निधी या विभागाला मिळाला आहे. विषय समितीमध्ये योजनांचे नियोजन केले आहे; पण अधिकार्‍यांअभावी आतापर्यंत एकही योजना मार्गी लागलेली नाही.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्ण वेळ अधिकारीच नसल्यामुळे यंदा या विभागाचा मंजूर अर्थसंकल्प कागदावरच दिसतो. दलित वस्ती सुधार योजना व जि. प. उपकरातून राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सध्या जवळपास ३६ कोटी रुपयांचा निधी या विभागाला मिळाला आहे.  ‘मार्च एण्ड’साठी अवघे दोनच महिने उरलेले असताना अद्यापही प्राप्त निधीतून छदामही खर्च झालेला नाही, हे विशेष!

दहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आले. त्यात मागील पाच महिन्यांपासून समाजकल्याण विभागाला पूर्ण वेळ अधिकारी मिळालेला नाही. तत्कालीन समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढण्यात आला. त्यानंतर दीड महिन्यांनी शेळके यांच्याकडे समाजकल्याण अधिकार्‍यांचा कार्यभार सोपविण्यात आला; परंतु ते कार्यालयात कधीच बसले नाहीत. गेल्या महिन्यात खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोकाटे यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला. मात्र, तेही दीर्घकाळासाठी सुटीवर गेले आहेत. त्यामुळे योजनांच्या नियोजनासाठी अधिकारीच नसल्यामुळे सभापती धनराज बेडवाल यांनी एकट्याने ‘खिंड’ लढविण्याचा प्रयत्न केला. विषय समित्यांमध्ये त्यांनी अनेक योजनांना मान्यता दिली असली तरी अधिकार्‍यांअभावी ‘बजेट’ खर्च करणे शक्य नाही. 

दलित वस्ती सुधार योजनेसाठी शासनाकडून ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून मागील वर्षात प्राप्त झालेल्या २३७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यापैकी १८० प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. १० प्रस्ताव रद्द झाले आहेत, तर उर्वरित ४०-४२ प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी २००-३०० प्रस्ताव प्राप्त झालेले असून, छाननीनंतर त्या प्रस्तावांचे भवितव्य ठरेल. निधी आहे; पण खर्च करायला अधिकारी नाही, अशी गत सध्या समाजकल्याण विभागाची झाली आहे. 

जि. प. उपकराचा २० टक्के निधी समाजकल्याण विभागाला देण्याचा नियम आहे. त्यानुसार उपकरातून वैयक्तिक लाभाच्या सुमारे १२ योजना राबवायच्या आहेत. यामध्ये लोखंडी पत्रे, ताडपत्र्या, आॅईल इंजिन, पाईप, झेरॉक्स मशीन, संगणक आदी योजनांचा समावेश आहे. अपंगांसाठी उपकरातील ३ टक्के निधी देण्याची तरतूद आहे. प्राप्त निधीतून अपंगांना घरकुल योजना राबविण्याचा निर्णय समाजकल्याण विषय समितीने घेतला आहे. ही योजना अंमलात आणण्यासाठी सध्या अपंग कल्याण आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आयुक्तालयातच पडून आहे. उपकरातून दोन्ही योजनांसाठी ६ ते ६.५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

निधी मुबलक; पण खर्च शून्ययासंदर्भात समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, या विभागाला पूर्णवेळ अधिकारी द्यावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विषय समितीमध्ये योजनांचे नियोजन केले आहे; पण अधिकार्‍यांअभावी आतापर्यंत एकही योजना मार्गी लागलेली नाही. अर्थसंकल्पाला आता अवघे दोनच महिने शिल्लक आहेत.त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पेच निर्माण झाला आहे. यामध्ये लाभार्थ्यांना वस्तूंचा लाभ द्यायचा की त्यांच्या खात्यात रक्कम जमा करायची, यासंदर्भात अन्य विभागांनी नेमके काय केले आहे, याची माहिती घेतली जात आहे. पूर्ण वेळ समाजकल्याण अधिकारी मिळावा म्हणून ‘सीईओ’ आर्दड यांच्याकडे मागणी केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद