कॅम्पस क्लब आणि डीएफसी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मार्च रोजी वेबिनारचे आयोजन केले होते. दरम्यान, गोविंद काबरा यांनी करिअर आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबतच अनेक चांगल्या सवयी आणि कौशल्ये कशी विकसित करायची. इयत्ता ९ वी पासूनच अभ्यास पद्धतीत कसे बदल करत जायचे, याविषयी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
याविषयी सांगताना ते म्हणाले, इयत्ता ९ वी व १० वी या दोन वर्षांत डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा, एमटीएसई, एनटीएसई, ज्युनिअर सायन्स ऑलिम्पीयाड अशा शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांचा योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास केल्यास शाळेपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची शिस्त लागते.
इयत्ता ९ वी आणि १० वीच्या तुलनेत ५ पट अधिक अभ्यास विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व १२ मध्ये करावा लागतो. योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची सवय नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना १० वी बोर्डात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवूनही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नाही. आपल्या मेंदूची शक्ती अफाट असून योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करता येईल, हे डॉ. श्रीकांत जीचकार यांनी कसे सिद्ध केले आहे, हे ही काबरा यांनी सांगितले.
चौकट :
पुन्हा वेबिनार ऐकण्याची संधी
इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हा वेबिनार विद्यार्थ्यांना काही कारणामुळे ऐकणे शक्य झाले नसल्यास क्युआर कोड स्कॅन करून विद्यार्थी हा वेबिनार पुन्हा ऐकू शकतात.
चौकट :
डीएफसीची वैशिष्ट्ये
- प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी विशेष हेल्पलाईन पद्धती.
- अभ्यास योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी सेल्फ स्टडी चार्ट.
- डीएफसी ॲपद्वारे घरबसल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक धड्यावर परीक्षा देण्याची सुविधा.
- स्पर्धा परीक्षा आणि शाळेचा अभ्यास यांची एकत्रित तयारी डीएफसी येथेच होते.
चौकट :
९ वीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्स
- इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजेनुसार २ प्रकारचे फाऊंडेशन कोर्स होत आहेत.
- ॲडव्हान्स कोर्सची नवीन बॅच १६ मार्चपासून सुरू होत असून रेग्युलर फाऊंडेशन काेर्सची बॅच १ एप्रिलपासून सुरू होते आहे.
सूचना
१. कॅम्पस क्लब आणि डीएफसीचा लोगो घेणे.
२. गोविंद काबरा यांचा सिंगल कॉलम फोटो.