वाळूज महानगर : छावणी रेल्वे उड्डाण पुलावरील धोकादायक बनलेली भिंत पाडून नवीन भिंत बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या विषयी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोमवारी या पुलावरील भिंत पाडण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेच्या अधिकाºयांनी या पुलाला भेट देऊन नवीन भिंत उभारण्याविषयी चर्चा केली होती. सोमवारी सकाळी मजुरांकडून धोकादायक बनलेली संरक्षक भिंत पाडण्यात आली. भिंत पाडताना रेल्वेची ये-जा सुरूअसल्यामुळे रेल्वेच्या अधिकाºयांनी या ठिकाणी देखरेखीसाठी कर्मचारी तैनात केले होते. आता नवीन संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.