लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वस्तू व सेवा कर विभागाच्या नवीन इमारतीचे अखेर बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने अद्यापही नवीन इमारतीमध्ये कार्यालय हलविण्यात आले नाही. कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून जवळपास १९ ते २० जण कार्यरत आहेत.वस्तू व सेवा कर विभागाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून हिंगोली शहरातील जिल्हा रूग्णालयासमोर टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे कर भरणाºयांना अधिकाधिक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय कार्यालयीन कर्मचाºयांचीही अपुरी जागा व कोंदट वातावरणातून मुक्तता होणार आहे. शिवाय सुविधायुक्त कार्यालयात आता कार्यालयीन कामांना गती येण्यास मदत होणार आहे.नागरिक व व्यापाºयांना सेवा कर भरण्याची सध्या आॅनलाईन कामे सुरळीत सुरू आहेत. शिवाय करासंदर्भात माहिती किंवा अडचणी असल्यास कार्यालयात सध्या मदत केंद्रही उपलब्ध असल्याची माहिती सहाय्यक राज्य कर आयुक्त नीलेश शेवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना यांनी दिली. तसेच सध्या किरायाच्या इमारतीमध्येही कार्यालयीन कामे व्यवस्थित होत आहेत, असे ते म्हणाले. लवकरच नवीन इमातीमध्ये कार्यालय हलविले जाईल. इमारत मुख्य ठिकाणी उभारण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
‘कर’विभागाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:02 AM