कायगाव : कायगाव येथे कृषी विभागाच्या पाहणीत पहिल्याच दिवशी बोंडअळीचे तीन नर पतंग आढळून आल्याने परिसरातील शेतकºयांत घबराट पसरली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मागील हंगामात कापूस उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातून अजूनही बळीराजा सावरला नसताना पुन्हा बोंडअळीचा धोका समोर उभा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.कायगाव भागात पिक व किड - रोग सल्ला प्रकल्पाअंतर्गत सुदाम गायकवाड यांच्या कापूस क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा कामगंध सापळा लावण्यात आला होता. त्यात पहिल्या दिवशीच तीन गुलाबी बोंडअळीचे नर पतंग आढळून आले. याची नोंद घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे कृषीशास्त्रज्ञ किशोर झाडे, गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, कृषी अधिकारी विष्णू मोरे, कृषी पर्यवेक्षक तुपे, कायगावचे कृषी सहायक शामकुमार काळे उपस्थित होते.यावेळी कृषीशास्त्रज्ञ किशोर झाडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.पहिल्या पावसानंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कोषावस्थेतून बाहेर पडले असून नर पतंग कामगंध सापळ्यातील कामगंधामुळे त्यात अडकत असल्याचे दिसून आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या निरीक्षणावरून कायगाव परिसरात गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र सुरु झाल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.त्यासाठी परिसरातील सर्व कापूस उत्पादक शेतकºयांनी आतापासूनच कामगंध सापळे लावल्यास नर पतंगाचे सामूहिक उच्चाटन करून किडीची संख्या कमी करणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले.कापूस पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी हे पतंग कामगंध सापळ्यात पकडून मारल्यास त्याचे प्रजनन कमी हाऊन किडीची संख्या काही प्रमाणात आटोक्यात आणता येईल आणि फुलोरा, पाते अवस्थेत पीक आल्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल, असेही ते म्हणाले.फुलोरा आणि पात्याच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी असल्यास पुढे आपोआप पिकावर प्रादुर्भाव कमी होईल, असे आवाहन त्यांनी केले. किडीचा प्रादुर्भाव होऊन त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अगोदरच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.गोदावरी नदीकाठी असणाºया कायगाव, जामगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भीवधानोरा, धनगरपट्टी, अगरवाडगाव, गळनिंब आदी भागात रोगाचा धोका जास्त असल्याने या भागातील शेतकºयांनी सामूहिक जबाबदारी घेऊन काम करण्याची गरज असल्याचे कृषी शास्त्रज्ञ किशोर झाडे यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र गायकवाड, रवींद्र शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, बन्सी शेख, सुदाम गायकवाड, अभिजीत वाघ, अनिल गायकवाड आदींसह कापूस उत्पादक शेतकरी हजर होते.कामगंध सापळ्याचा वापर कराकामगंध सापळ्याची सरासरी किंमत ६० ते ८० रुपये असते. असे एकरी ८ सापळे पिकापेक्षा १ फुट उंचीवर लावावेत. एकरी ८ सापळ्यास कापूस उत्पादक शेतकºयांना ४८०- ६४० रुपये एवढाच खर्च येइल. परंतु शेतकºयांना होणाºया लाखोंच्या नुकसानीपेक्षा हा खर्च करणे आणि यातून रोगाचे सामूहिक उच्चाटन करणे सोपे जाईल, असे कृषी खात्याच्या अधिकाºयांनी सांगितले.फोटो :कायगाव भागात कृषी विभागाच्या पाहणीत कापूस पिकावर बोंडअळीचे नर पतंग आढळून आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किशोर झाडे, गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, कृषी अधिकारी विष्णू मोरे आदी.
कायगाव परिसरात बोंडअळीचे नर पतंग आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:10 AM