औरंगाबाद : बीड बायपास रोडजवळील राजेशनगरात घरफोडी करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
राजेशनगरात राहणारी महिला घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी १८ ते १९ एप्रिलदरम्यान घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम ४७ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.