औरंगाबाद : सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे भूमिपूजन आज चालक आणि वाहक महादेव गीते, सुदाम आधाने यांच्या हस्ते तर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वाहक नारायण शिंगाडे आणि त्यांच्या पत्नी गायत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती.
पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेतील सिडको बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन आज करण्यात आले. शहरात दशकभरापासून अद्ययावत बसस्थानकाची प्रतीक्षा आहे. मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. सध्या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जवळपास ४.६ एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक उभारले जाणार आहे.पूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यात येणार होते. मात्र, खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्सफर-लीज’ तत्त्वावर आधुनिक बसपोर्टसह व्यापारी संकुल बांधून महामंडळास विनामूल्य हस्तांतर करण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची वेळ आली. त्यासंदर्भात मुंबई येथे प्रक्रिया करण्यात आली.
बसपोर्ट २४ महिन्यांतबसपोर्टचे काम सुरू झाल्यानंतर २४ महिन्यांत उभारणी करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. बसपोर्ट उभारणीसंदर्भातील सर्व प्रक्रिया मुंबई येथून करण्यात आली.
बसपोर्टमध्ये या सुविधाविमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. याठिकाणी बस प्लॅटफॉर्म, फूड कोर्ट, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, वातानुकूलित विश्रामगृह आदी सुविधा राहतील. ‘डोम’ ही बसपोर्टची अद्वितीय ओळख राहणार आहे. हे डोम म्हणजे प्रतीक्षालय.
मध्यवर्ती बसस्थानक १८ महिन्यांतप्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर १८ महिन्यांत मध्यवर्ती बसस्थानकाची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बसस्थानकाचा कंत्राटदार निश्चित झाला आहे.
बसस्थानकात या सुविधा नव्या मध्यवर्ती बसस्थानकात २८ प्लॅटफ ार्म राहणार आहेत. याठिकाणी तिक ीट आरक्षण क ार्यालय, वाहतूक नियंत्रण क ार्यालय, पार्सल कक्ष, महिलांसाठी हिरक णी क क्ष, शिवशाही, शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी वातानुकू लित क क्ष असतील. जेनेरिक मेडिक ल स्टोअर्स, खुले उपाहारगृह, चित्रपटगृह आदी सोयीसुविधाही उभारण्याचे नियोजन आहे.