शिबिराचे उद्घाटन मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. एम. यू. कसाब यांच्या हस्ते झाले. त्यांनी शिबिरातील विषयानुसार पवित्र शास्त्राआधारे मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष रेंव्ह. अनिल इनामदार यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे उद्दिष्ट व कार्याची माहिती दिली. समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा वसा घेऊन संस्था कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. तद्नंतर मार्गदर्शक डाॅ. सेल्वम डॅनियल यांनी दृष्टांत (व्हिजन), धाेरण व कृती किती महत्त्वाची असतात हे सांगितले, तर राहुल मित्रा यांनी सकारात्मक विचार, संयम व प्रार्थना यांची सांगड घालत, व्यवसाय करत असताना या बाबीची कशी आवश्यकता असते हे सांगितले. तसेच धाडस कसे व काेणत्या प्रकारे असावे हे प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले. अंबर अमाेलिक यांनी व्यवसाय करण्यासाठी, काेणकाेणत्या सरकारी कागदपत्रांची, परवानगीची आवश्यकता असते या संबंधीची सविस्तर माहिती दिली.
सेंट फिलीप चर्च, ख्राईस्ट चर्च आणी सिडकाेतील सेंट स्टिफन चर्चच्या ११ युवकांनी कोरोना नियम पाळून शिबिराचा लाभ घेतला. मराठवाडा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेंव्ह. सुशील घुले आणी रेंव्ह. रंजन राठाेड यांचे सहकार्य लाभले. धर्मप्राताचे खजिनदार रेंव्ह. पी. के. अकसाळ यांच्या अथक परिश्रमाने शिबिर यशस्वी झाले. आभार प्रदर्शनानंतर प्रार्थनेने शिबिराचा समाराेप झाला.