शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

व्यापारी, प्रशासन परळीत समोरासमोर

By admin | Published: August 26, 2015 11:45 PM

परळी : शहरातील मोेंढा मार्केट भागात बुधवारी सकाळी कपड्याच्या दुकानासमोरील पायऱ्याच्या फरशा नगर परिषदेच्या जेसीबीच्या सहाय्याने काढल्याच्या

परळी : शहरातील मोेंढा मार्केट भागात बुधवारी सकाळी कपड्याच्या दुकानासमोरील पायऱ्याच्या फरशा नगर परिषदेच्या जेसीबीच्या सहाय्याने काढल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला व व्यापाऱ्यांनी सम, विषम तारखेस पार्कींग व्यवस्था करण्याला कडाडून विरोध करीत दुकाने बंद ठेवली.राणी लक्ष्मीबाई टॉवर ते एकमिनार चौक या दरम्यान पी-१, पी-२ ची अंमलबजावणी करण्याचा निर्धार न.प. व पोलीस प्रशासनाने केला. त्या अनुषंगाने बुधवारी मोंढा भागातील, शंकुरवार यांचे कृष्णा रेडीमेड व कृष्णा टेक्सटाईल्स, काकडे यांचे रामानंद ड्रेसेस या दुकाना जवळील पायऱ्याच्या फरशा काढण्यात आल्या त्यामुळे या ठिकाणी कपड्याचे व्यापारी जमले. लागलीच इतर व्यापारी ही या ठिकाणी धावून आले व पी-१, पी-२ ची अंमलबजावणी करण्यास विरोध दर्शविला. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव निघोट यांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी काबरा व निरीक्षक निघोट यांच्यात शाब्दीक चकामक झाली. त्यामुळे वातावरण संतप्त झाले व मोंढा ते टॉवर या भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यापारी व पोलीस प्रशासनाची बैठक घेतली व त्यामध्ये शुक्रवारी पी-१, पी-२ च्या संदर्भात निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. या नंतर संतप्त व्यापारी शांत झाले. दरम्यान, व्यापाऱ्यांशी बोलणी सुरू असून, तोडगा काढण्यात येईल, असे निरीक्षक सोपानराव निघोट यांनी सांगितले. (वार्ताहर)