शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चालढकलीसाठी ‘बसपोर्ट’चे गाजर

By admin | Published: October 04, 2016 12:32 AM

औरंगाबाद : पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमुळे जगविख्यात आणि आता स्मार्ट सिटी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण होत आहे

औरंगाबाद : पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमुळे जगविख्यात आणि आता स्मार्ट सिटी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण होत आहे; परंतु याच शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था या सर्वांना लाजवेल अशी झाली आहे. छताची परिस्थिती पाहून बसस्थानक कोसळतेय काय? या भीतीने पर्यटक आणि प्रवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो; परंतु याकडे दुर्लक्ष करून मागील दहा वर्षांपासून सुसज्ज बसस्थानक बांधण्याचे ‘गाजर’एस.टी. महामंडळाकडून दाखविण्यात आले. सुसज्ज बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारणार असल्याचे म्हणत चालढकल करीत आहे.महाराष्ट्रातील शहरे, खेडोपाडी आणि परराज्यांमधून दररोज हजारो प्रवासी, पर्यटक शहरातून ये-जा करतात. मध्यवर्ती बसस्थानकात दररोज दिवसभरात सातशेपेक्षा अधिक बसेस आणि २० ते २५ हजार प्रवासी ये-जा करतात; परंतु हेच बसस्थानक आज समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या दहा वर्षांत या बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. जागोजागी छताचे प्लास्टर उखडले आहे. एवढ्यावरच ही परिस्थिती थांबलेली नसून थेट प्रवाशांच्या अंगावर प्लास्टर पडण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे छतामधील लोखंडी गजही उघडे पडले आहेत. पावसामुळे बसस्थानकातील छत, खांब आणि भिंतीमधून पाणी झिरपत आहे.बसस्थानकाची इमारत अधिक धोकादायक बनत आहे. ही सर्व अवस्था पाहून बसस्थानक कोसळतेय काय, अशी चिंता प्रवाशांमधून व्यक्त होते. याकडे दुर्लक्ष करून महामंडळ केवळ उत्पन्न मिळविण्यावर भर देत असल्याच्या संतप्त भावना प्रवाशांमधून व्यक्त होतात. मागील दहा वर्षांपासून अद्ययावत बसस्थानक बांधण्याचे ‘गाजर’ महामंडळाक डून दाखविण्यात आले, तर त्यानंतर आता बसपोर्ट उभारण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा संयम सुटत आहे.