शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर परस्पर विक्री करणा-या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 6:21 PM

कामासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅकेटचा ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश केला.

ठळक मुद्देविविध ठिकाणच्या शेतक-यांना विक्री केलेले १७ ट्रॅक्टर आणि एक कार असा सुमारे ७४ लाखाचा ऐवज जप्त केला.कर्जाचे हप्ते परत फेड होईल या आशेपोटी आरोपींकडे मालक ट्रॅक्टर सुर्पूद करीत. यानंतर आरोपी ट्रॅक्टरची बनावट कागदपत्रे तयार करून ते विविध जिल्ह्यात विक्री करीत. 

औरंगाबाद : कामासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅकेटचा ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. रॅकेटमधील दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या शेतक-यांना विक्री केलेले १७ ट्रॅक्टर आणि एक कार असा सुमारे ७४ लाखाचा ऐवज जप्त केला.

शेख अन्वर शेख मुसा (रा. हुसेननगर,सातारा)आणि देवीलाल सरदारसिंग राजपूत (रा.पांगरा,ता.कन्नड) अशी अटकेतील आरोपींची  नावे आहेत. अधिक माहिती देताना ग्रामीण गुन्हेशाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की,  पिसादेवी येथील रहिवासी भगवान विष्णू वायाळ यांनी चिकलठाणा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांचे ट्रॅक्टर आरोपी शेख अन्वर आणि शेख इब्राहिम उर्फ शेख ईस्माईल यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर भाड्याने नेले आणि नंतर ते परस्पर गायब केले. तर अशाच प्रकारची दुसरी तक्रार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बळीराम साहेबराव राठोड (रा.आंबा तांडा, कन्नड)यांनी नोंदविली होती. यावरुन आरोपी शेख शकील शेख शब्बीर(रा.श्रीराम कॉलनी, कन्नड),देवीलाल सरदारसिंग राजपूत((रा.पांगरा,ता.कन्नड) आणि नासेर शेख रसुल शेख (रा.मोमीनपुरा,कन्नड) यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

कन्नड पोलीस आणि ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हेशाखा पोलिसांनी शेख अन्वर यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत भगवान यांचा ट्रॅक्टर त्याने त्याचा साथीदार देवीलाल राजपूत याने विविध ठिकाणी विक्री केल्याची क बुली दिली. नंतर कन्नड पोलिसांनी देवीलाल यास पकडले. यानंतर दोन्ही पोलिसांनी संयुक्त तपास केला.  या तपासात दोन्ही आरोपींनी  सांगितले की, आरोपी हे स्वत:ला मोठा कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून ट्रॅक्टरमालकाचा विश्वास संपादन करीत. चालक आमचा असेल आणि इंधनही आम्हीच टाकू तुम्ही केवळ ट्रॅक्टर द्या, आम्ही तुम्हाला दरमहा भाडे देत राहू असे सांगून विश्वास संपादन करीत. बहुतेक ट्रॅक्टरवर कर्जाचा बोझा असतो. कर्जाचे हप्ते परत फेड होईल या आशेपोटी आरोपींकडे मालक ट्रॅक्टर सुर्पूद करीत. यानंतर आरोपी ट्रॅक्टरची बनावट कागदपत्रे तयार करून ते विविध जिल्ह्यात विक्री करीत. 

खरेदीदारांचीही फसवणुकआरोपींनी आतापर्यंत नाशिक, अमरावती, परभणी, हिंगोली, अहमदनगर, पुणे , जिंतूर, वसमत, चाळीसगाव, खेड, पुणे, आळेफाटा आदी ठिकाणी ट्रॅक्टर विक्री केल्याची कबुली दिली. त्यांनी ट्रॅक्टर मालकाचा विश्वासघात करणेसोबतच ट्रॅक्टर खरेदी करणा-यानाही लाखो रुपयांचा गंडा घातला. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू केला.

यांनी केली कामगिरीया रॅकेटचा पर्दाफाश करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, उपअधीक्षक अशोक आमले, निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक विवेक जाधव, कर्मचारी नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, सागर पाटील, रामेश्वर धापसे, गणेश गांगवे, ,उपनिरीक्षक साळुंके, बेबरे यांनी केली.