शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

वाद मिटविण्यासाठी बोलावले अन् भोसकून संपविले; विवाह १५ दिवसांवर असताना तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 12:30 PM

हर्सूल कारागृहाच्या समोरील मैदानातील घटना : पाचजणांचे कृत्य, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जुना वाद मिटविण्यासाठी एकास हर्सूल कारागृहासमोरील मैदानावर सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. त्याच्यासोबत इतर मित्र नसल्याचा फायदा घेत चाकूने भोसकत क्रिकेट खेळण्याच्या बॅटने मारहाण करीत खून केला. हा वाद सोडविण्यास आलेल्या मृताच्या मित्रासही चाकूने मारहाण केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश ऊर्फ बबलू परमानंद मोरे (वय ३२, रा. चेतनानगर, हर्सूल परिसर) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये गणेश सोनवणे, अनिकेत ऊर्फ विक्की गायकवाड याच्यासह इतर पाचजणांचा समावेश आहे. सुमीत चव्हाण असे जखमीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दिनेशचे आरोपी गणेश सोनवणे याच्यासोबत सहा महिन्यांपासून वाद सुरू होते. सोमवारी दुपारी आरोपींनी दिनेशला हर्सूल कारागृहाच्या समोरील रिकाम्या मैदानात वाद मिटवायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले. दिनेश एका सहकाऱ्यासोबत मैदानावर गेला. तेथे आरोपीतील एकाने त्यास चाकूने भोसकले. इतर आरोपींनी क्रिकेटची बॅट, रॉड आणि लाकडाने मारहाण केली. त्यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याला सोडविण्यासाठी सुमीत चव्हाण आला असता, त्याच्या पाठीवरही चाकूने वार करण्यात आले. तोही गंभीर जखमी झाला. हा प्रकार पाहून बघ्यांची गर्दी जमली. तेव्हा आरोपींनी कारमधून धूम ठोकली. त्यानंतर नागरिकांनी दिनेश व सुमीत यांना घाटी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दिनेश ऊर्फ बबलू यास मृत घोषित केले. सुमीतवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सहायक आयुक्त धनंजय पाटील, सपोनि शेषराव खटाणे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली.

घटनास्थळी बघ्यांची, तर घाटीत समर्थकांची गर्दीहर्सूल कारागृहाच्या समोरील मैदानात हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याच वेळी दिनेशचा मृतदेह घाटी रुग्णालयात असल्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराने घाटीत माेठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथके तैनात केली आहेत.

मृताचा १५ डिसेंबरला होता विवाहरिक्षाचालक असलेल्या दिनेशचे सहा महिन्यांपूर्वी लग्न जमले होते. त्याचा साखरपुडाही झाला होता. त्याचे लग्न १५ डिसेंबरला होणार होते, अशी माहिती मित्रांनी दिली. या घटनेमुळे दिनेशच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर