औरंगाबाद : माडीवाडाजवळील हर्ष पेट्रोल पंपवार गुरुवारी सकाळी ९ वाजून ३८ वाजता पिस्तुल रोखत १ लाख २६ हजार रुपये लुटल्याची थरारक घटना घडली. स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी काही कळायच्या आत ही लुट केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा घटनाक्रम रेकॉर्ड झाला असून पोलीस लुटारूंचा शोध घेत आहेत. ( stopped a pistol and looted Rs 1 lack 26 thousand at Petrol Pump Near Maliwada )
हर्ष पेट्रोल पंपच्या कार्यालयात सकाळी कर्मचारी पैसे मोजत होते. या दरम्यान, स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोघांनी पेट्रोल पंपावर मध्यभागी गाडी लावली. पंपाच्या कार्यालयाकडे शांतपणे चालत गेले. त्यांच्यावर कोणाचा संशय नव्हता. कार्यालयाच्या दरवाजात पोहचताच अचानक एकाने कंबरेचे पिस्तुल काढत आतील पैसे मोजणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर रोखले. तर दुसऱ्याने धारदार शस्त्र दाखवत जवळच्या पिशवीत पैसे टाकण्यास सांगितले. एकूण १ लाख २६ हजार रुपये घेऊन दोघे चोरटे शांतपणे त्यांच्या दुचाकीपर्यंत गेले. दुचाकीवर बसताच पेट्रोल पंपाला वळसा घालुन औरंगाबादच्या दिशेने पोबारा केला. या घटनेची माहिती समजताच पंपाचे मालक आशिष काळे, दिलीप चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात
चोरीच्या आधी केली रेकी चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पंपावर येत रेकी केली असल्याचे सिसिटिव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला येताना त्यांनी तोंडाला काहीही बांधलेले नव्हते. यावरून पोलीस अधिक तपास करत आहेत.