बीड : गणेश विसर्जनाची तयारी प्रशासनाकडून जवळपास पूर्ण होत आली आहे. पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला असून साध्या वेशात काही महिला, पुरूष कर्मचारी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. तसेच मिरवणूक मार्ग व संवेदनशील ठिकाणांवर कॅमे-यांचा वॉच राहणार आहे.
गणेश स्थापनेनंतर गौरी गणपतीचा सण जिल्हाभरात उत्साहात आणि शांततेत साजरा झाला आहे. २३ सप्टेंबरला रोजी गणेश विसर्जन होत आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांची तसेच मिरवणूक मार्गांची पाहणी करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिका-यांना दिल्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले. तसेच बंदोबस्तासाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून अधिक कुमक मागविल्याचेही ते म्हणाले.
१२८६ डीजे मालकांना नोटीस, २० दिवसांत पोलिसांच्या ठोस कारवाया
गणेशोत्सव, मोहर्रम शांततेत पार पाडण्यासाठी तसेच या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २० दिवसात पोलीस दलाच्या वतीने ठोस कारवाया झाल्या. १२८६ डी. जे. मालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या. रेकॉर्डवरील वॉन्टेड ९ आरोपींना पकडले. यापैकी दोघांवर बीड जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली. एमपीडीए अंतर्गत आलेल्या ५ प्रस्तावापैकी दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत ४४८ आरोपींवर केसेस करण्यात आल्या. अवैध शस्त्र बाळगणाºया ४ आरोपींवर कारवाई करण्यात आली. विशेष मोहीम राबवून बºयाच कालावधीपासून न्यायालयात हजर न राहणाºया १४ तसेच अजामिनपात्र वॉरंटमधील १६८ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. ६०८ आरोपींना जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. १०५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
यातील २८ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत ११८ जणांवर तर २७९ उपद्रवी लोकांवर सीआरपीसी अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर महिला - मुलींची छेड काढणाºया ५१ रोडरोमिओंवर मुंबई पालीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.
असा राहणार पोलीस बंदोबस्तपोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ७ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ६१ सहा.पोलीस निरीक्षक, ६४ पोलीस उपनिरीक्षक, १८२९ पोलीस कर्मचारी यांच्यासह बाहेर जिल्ह्यातून १ उपअधीक्षक, ४ पोलीस निरीक्षक, २ आरसीपी प्लाटून, ४०० होमगार्ड असा बंदोबस्त राहील.