कन्नड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोरोनावर नियंत्रण व मात करण्यासाठी महिला बालविकास विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत विशेष धडक मोहीम नियोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची सखोल आरोग्य तपासणी, लसीकरण व सॅम आणि बालकांची शोध मोहिमेंतर्गत बालकांची वजने, उंची, लांबी घेणे हा कार्यक्रम चालणार आहे. शंभर टक्के बालकांची वजने, उंची घेऊन त्यातील साधारण श्रेणी सॅम व मॅम श्रेणी निवडून दुर्बल बालकांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केले जाणार आहे. तर सॅम बालकांची व्हीसीडीसी सुरु केली जाणार आहे. अशी माहिती प्रकल्प(१) अधिकारी ज्योत्स्ना गहेरवार यांनी दिली.
कन्नडमध्येही मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:02 AM