औरंगाबाद : शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. याविषयीचे आदेश शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.आरटीई प्रवेशांतर्गत पहिल्या फेरीची सोडत ८ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. यामध्ये प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीद्वारे कागदपत्रांची तपासणी करून शाळेत जाऊन प्रवेश घेतले. पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसºया फेरीची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी पालकांना अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला मात्र कन्फर्म केला नाही, त्यांना ही कन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या पालकांचा क्रमांक पहिल्या फेरीत लागला नाही. त्यांचे गुगल लॉगीन चुकले असल्यास ते दुरुस्त करता येईल. त्यात दुरुस्त करताना शाळांची निवड नव्याने करावी लागणार आहे. मात्र, त्यात नाव आणि जन्मतारखेत काहीही बदल करता येणार नाही. ही दुरुस्ती २९ मे पासून ४ जूनपर्यंत करता येणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.चौकटयावर्षीही प्रवेश प्रक्रिया लांबणारमागील वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या होत्या. प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे इच्छुक पालकांनी आरटीई प्रवेशाऐवजी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रवेश घेऊन टाकले. यावर्षीही मे महिना संपला तरी फक्त पहिली फेरी पूर्ण झाली आहे. दुसºया फेरीची सोडत केव्हा निघणार याविषयी अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया लांबणार असल्याचे स्पष्ट झाले. ही प्रक्रिया लांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा राहण्याची शक्यता आहे.
आरटीई आॅनलाईन प्रवेश अर्जात बदल करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:01 PM