चौकट,
दोन्ही आरोपींनी नारेगाव येथील फैजानचे थकलेले पैसे परत देण्यासाठी कारची चोरी केल्याची कबुली दिली. ही कार मुंबईत नेऊन विक्री करण्याचा त्यांचा डाव होता. चोरीच्या तयारीनेच हे आरोपी आले होते. या प्रकरणात रोहन संजय इंगळे (रा. पिसादेवी) यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सीचे निरीक्षक व्यंकटराव केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकाने केली.
चौकट,
पाठलाग करताना इतरांची मदत
गुन्हे शाखेचे पथक पाठलाग करीत असताना चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचे वेगवेगळ्या ठिकाणचे लोकेशन पाठवणारी एक यंत्रणा कार्यरत होती. या यंत्रणेच्या मदतीमुळेच पथकाला पाठलाग करीत आडमार्गे जात आरोपींना पकडण्यात यश आले.